Published On : Mon, Sep 16th, 2024
By Nagpur Today Nagpur News

आ. प्रवीण दटके यांच्या विशेष आमदार निधीतून 12 कृत्रिम टॅंक

शहरातील विविध ठिकाणी ४१९ कृत्रिम टँकची व्यवस्था
Advertisement

नागपूर : :यंदाचा गणेशोत्सव पर्यावरण पूरक साजरा व्हावा यासाठी नागपूर महानगरपालिका प्रयत्नशील आहे. अशात नागपूर महानगरपालिकाद्वारा आमदार प्रवीण दटके यांच्या विशेष आमदार निधीतून चिटणीस पार्क महाल येथे 12 कृत्रिम टॅंक ची व्यवस्था करण्यात आली आहे. हे टॅंक आंतरराष्ट्रीय दर्जाचे असून, जर्मनी येथून आले आहेत.

रविवार (ता:१५) रोजी चिटणीस पार्क,महाल येथे आयोजित छोटेखानी समारंभात आमदार प्रवीण दटके यांच्या हस्ते या कृत्रिम टॅंकचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी माजी आमदार अनिल सोले, गांधीबाग झोनचे सहायक आयुक्त श्री. गणेश राठोड, , माजी महापौर श्री. दयाशंकर तिवारी, क्रीडा अधिकारी डॉ. पियुष आंबुलकर, यांच्यासह मनपाचे अधिकारी कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Gold Rate
Feb 24rd, 2026 - Time 11.45Hrs
Gold 24 KT ₹ 160,600 /-
Gold 22 KT ₹ 1,49,400 /-
Silver/Kg ₹ 2,66,300 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

चिटणीस पार्क महाल येथे स्वर्गीय प्रभाकरराव दटके स्मृती प्रतिष्ठान आणि इतर स्वयंसेवी संस्थांद्वारे विसर्जनासाठी येणाऱ्या गणेश भक्तांची मदत केली जात आहे.

नागपूर महानगरपालिकातर्फे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शहरात विविध ठिकाणी कृत्रिम हौदांची व्यवस्था करण्यात आली आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात व अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांच्या नेतृत्वात घनकचरा व्यवस्थान विभागातर्फे संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. अशात आता नवव्या व दहाव्या दिवसाच्या श्री गणेश मूर्ती विसर्जनासाठी मनपा सज्ज असून, शहरातील २०९ ठिकाणी ४१९ कृत्रिम टँकची व्यवस्था करण्यात आली आहे. मनपाद्वारे गणेश भक्तांच्या सोयीनुसार शहरात ४१९ विसर्जन टँकची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय सेट्रिंगचे ३३१ , रबरीचे ३१, खड्डे करून ३२, कॉक्रीटचे ३ आणि फिरते २२ टँक ची सोय करण्यात आली आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement