Published On : Sun, Dec 1st, 2019

जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांचा सत्कार

Advertisement

नागपूर: बाल कामगार प्रथेविरुध्द राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभागासाठी आज कामगार आयुक्त कार्यालयातर्फे जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांचा त्यांच्या दालनात शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन विजयकांत पानबुडे, अपर कामगार आयुक्त यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. या सत्कार प्रसंगी सहाय्यक कामगार आयुक्त राजदिप धुर्वे, प्रभारी सहाय्यक कामगार आयुक्त मा.पे.मडावी व समन्वयक हे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी जनजागृती अभियानात सक्रीयतेने सहभाग घेतला. बाल कामगारांच्या प्रश्नाबाबत तसेच समस्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात समन्वय साधून विविध यंत्रणांना या जनजागृती सप्ताहात कार्यान्वीत केले. या सत्काराप्रसंगी जिल्हाधिकारी श्री. ठाकरे म्हणाले की फक्त शासकीय अधिकारी म्हणून चौकटीत काम न करता एक माणूस म्हणून अनिष्ठ प्रथांना विरोध केला पाहिजे.

बालकामगारांच्या पुर्नवसनाची सुध्दा समाजातील सर्वच घटकांची जबाबदारी आहे. बाल कामगार कामावर न ठेवता, कामगार कुठेही आढळल्यास त्याबाबत विरोध करण्याची समाजातील प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे व यांत समाजातील सर्वच घटकांनी सहकार्य करावे असे.