Published On : Mon, May 25th, 2020

जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी नवीन कामठी येथील लुंबिनी नगरात प्रतिबंधित क्षेत्राला भेट देऊन पाहणी केली

कामठी :- नवीन कामठी परिसरातील लुंबिनी नगरात 24 वर्षाचा तरुण कोरोनाचा पॉझिटिव आढळून आल्याने प्रशासनाने लुंबिनी नगर परिसर सिल करण्यात आला असून आज नागपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी लुंबिनी नगरातील प्रतिबंध क्षेत्राला भेट देऊन पाहणी केली

लुंबिनी नगरातील 24 वर्ष तरुण 15 मे ला मुंबईवरून कामठी येथे आला होता त्याची 22 मे ला आरोग्य तपासणी केली असता तो पॉझिटिव आढळून आला आहे

प्रशासनाने गंभीर दखल घेत सदर तरुणांच्या संपर्कात आलेल्या सर्व नागरिकांची यादी तयार करून त्याची मेयो हॉस्पिटल नागपूर येथे आरोग्य तपासणी करता पाठवण्यात येणार आहेत आज नागपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी नवीन कामठी येथील लुंबिनी नगरातील प्रतिबंधक क्षेत्राला भेट देऊन पाहणी केली पुढील उपाय योजना संदर्भात तालुका प्रशासनाला आदेश दिले यावेळी उपविभागीय अधिकारी श्याम मदनूरकर, तहसीलदार अरवींद हिंगे, कामठी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सचिन सूर्यवंशी ,,

कामठी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी रमाकांत डाके, नवीन कामठीचे ठाणेदार संतोष बकाल, जुनी कामठीचे ठाणेदार देविदास कठाणे तालुका आरोग्य अधिकारी डॉ अश्विनी फुलकर कामठी नगर परिषद नागरी सुविधा केंद्राच्या डॉ शबनम खानूनी कामठी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ धिरज चोखाद्रे उपस्थित होते