Published On : Fri, Aug 12th, 2022
By Nagpur Today Nagpur News

अखंड भारत संकल्प दिनानिमित्त सामूहिक वंदे मातरम १३ ला

Advertisement

नागपूर – अखंड भारत संकल्प दिनानिमित्त 13 ऑगस्ट 2022 रोजी सामुहिक वंदेमातरम कार्यक्रम विद्यार्थ्यांना व युवा पिढीला अखंड भारताचे स्वरूप व वैशिष्ट्यांचा इतिहास माहित व्हावा व अखंड भारताविषयी जागरूकता व राष्ट्रिय चेतना निर्माण व्हावी. या दृष्टीकोनातून मातृभूमी प्रतिष्ठानतर्फे मागील 12 वर्षापासून नागपूर येथील सक्करदरा चौक या ठिकाणी अखंड भारत संकल्पदिन 14 ऑगस्ट दिवसाचे औचित्य साधुन मोठ्या उत्साहाने सामुहिक वंदे मातरम्’ या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे.

यावर्षी सुध्दा या कार्यक्रमाचे आयोजन सक्करदरा चौक येथे शनिवारी 13 ऑगस्ट 2022 ला सकाळी 7:30 वाजता करण्याचे योजीले आहे. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मा.खासदार मुकुल वासनिक (माजी केंद्रीय मंत्री) तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्र मा. नानाभाऊ पटोले यांच्या उपस्थितीत होणार आहे या कार्यक्रमात आपन सर्व नागरिकांनी सकाळी ठिक 7.00 वाजता कार्यक्रमाच्या स्थळी हजर रहावे असे आवाहन मातृभूमी प्रतिष्ठान नागपुरच्या वतीने समस्त नागरिकांना व शाळेच्या मुख्याध्यापकांना आवाहन डॉ.रविंद्र (छोटू)भोयर मातृभूमी प्रतिष्ठान रेशीमबाग च्यावतीने पत्रपरिषदेमध्ये माहिती दिली.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या पत्रपरिषदेला रवींद्र भोयर उर्फ छोटू भोयर, गिरीश पांडव, सत्यजित दस्तुरे, विलास करांगळे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष तौसिफ खान, रोनक चौधरी, अमोल धरमारे, पंकज बालपांडे, आकाश गुजर, सतीश यादव, यांची उपस्थिती होती.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.