नागपूर : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच नागपूरसह विदर्भात थंडीचा जोर वाढला आहे. यामुळे बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा सामान्यापेक्षा कमी आहे.
नागपुरात शुक्रवारी किमान तापमान 9 अंश सेल्सिअस होते, जे सामान्यपेक्षा 3.5 अंश कमी आहे. गोंदियामध्ये थंडीने सर्व विक्रम मोडले, जेथे तापमानाचा पारा 8.8 अंश सेल्सिअसपर्यंत घसरला, त्यामुळे ते संपूर्ण विदर्भातील सर्वात थंड ठिकाण ठरले. बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमान 12 अंश सेल्सिअसच्या खाली नोंदवण्यात आले आहे.
तज्ज्ञांच्या मते, उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे सायंकाळच्या वेळी तापमानात झपाट्याने घट होत आहे. रात्रीचे किमान तापमान सामान्यपेक्षा कमी आहे, तर दिवसाचे कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त आहे.
स्थानिक प्रशासनाने थंडीच्या या वाढत्या प्रभावामुळे नागरिकांना खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. विशेषत: वृद्ध आणि लहान मुलांनी थंडीपासून बचाव करण्यासाठी पुरेसे उबदार कपडे घालण्याचा सल्ला दिला आहे.