Advertisement
नागपूर: शहराजवळील वडोदा ग्रामपंचायतच्या हद्दीत महाऊर्जाच्या 12 मीटर व 9 मीटर हायमास्ट लाईटचे लोकार्पण पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते नुकतेच झाले
महाऊर्जातर्फे 12 मीटर व 9 मीटर उंचीचे हायमास्ट, नवीन आरएसजे पोलसह एलईडी लाईट लावणे व जुने लाईट बदली करून नवीन एलईडी लाईट आस्थापित करण्याचे काम करण्यात आले. या कामाचे लोकार्पण पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी 4 हायमास्ट व 25-36 वॅटचे एकूण 80 लाईट बदली करण्यात आले. या कार्यक्रमाला रमेश चिकटे, सभापती अनिता चिकटे, महाऊर्जाचे अधिकारी, सरपंच व अन्य मान्यवर उपस्थित होते.
Advertisement