Published On : Fri, Jan 24th, 2025
By Nagpur Today Nagpur News

भंडाऱ्यातील ऑर्डिनेंस फॅक्ट्री स्फोटप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया,म्हणाले…

Advertisement

भंडारा : भंडारा जिल्ह्यातील आयुध निर्माणी जवाहर नगर येथे आज सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास एका फॅक्टरी स्फोट झाल्याची घटना सामोरे आली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत ८ कामगारांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले. या घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दु:ख व्यक्त करत प्रतिक्रिया दिली.

फडणवीस म्हणाले की, भंडारा जिल्ह्यातील ऑर्डिनन्स फॅक्टरीमधील स्फोटाच्या घटनेत छत कोसळून १३ ते १४ कामगार अडकल्याचे वृत्त आहे. याठिकाणी मदतकार्य सुरु आहे. जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक हे घटनास्थळी असून सर्व प्रकारची मदत पुरवण्यात येत आहे.

बचाव कार्यासाठी एसडीआरएफ तसेच नागपूर महापालिकेची चमू सुद्धा पाचारण करण्यात आल्या असून त्या लवकरच पोहोचतील. संरक्षण दलासोबत जिल्हा प्रशासन समन्वयाने मदत कार्यात सहभागी आहे. वैद्यकीय मदतीसाठी पथकही घटनास्थळी कार्यरत आहे.

या घटनेत आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला. दुर्घटनेतील मृतांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, असेही फडणवीस म्हणाले.
दरम्यान या घटनेमुळे कामगारांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.