Published On : Fri, Feb 14th, 2020

ग्राहकांना लाखो रूपयाचा गंडा घालणारा सोनाराला 17 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी

Advertisement

कामठी :-स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या गर्भश्रीमंतांची वस्ती म्हणून ओळख असलेल्या सोनार ओली परिसरातील स्वर्ण योजनेच्या नावावर 45 लक्ष रूपयाची फसवणूक करून पळ काढलेल्या प्रदिप ज्वेलर्स चे प्रदीप ढोमने वर फसवणुकीचा गुन्हा 21जानेवारीला करण्यात आला होता या घटनेला विराम मिळत नाही तोच 22 लक्ष 9 हजार 350 रुपयांची फसवणूक करणाऱ्या संजय ज्वेलर्स चे अजय फकिरचंद गुरव वय 48 वर्षे रा सोनार ओली कामठी वर कलम 420 अनव्ये गुन्हा दाखल करीत आरोपीला आज नागपूर सेथील सेशन कोर्टात हजर केले असता आरोपीला 17 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.

पोलिसानी दिलेल्या माहिती नुसार सोनार ओली स्थित काही स्वर्णकार वापारा कडून स्वर्ण योजना राबविण्यात आले होते या स्वर्ण योजनेत ग्राहक जमा ठेव च्या माधमातुन काटकसरीने महिनेवारी रक्कम जमा करीत असत सरते वर्षे शेवटी जमा असलेल्या रकमेतून इच्छेनुसार दागिने तयार करायचे यानुसार संजय ज्वेलर्स सराफा दुकानात ग्राहकांनी 28 फेब्रुवारी 2018 ते 2 मे 2019 दरम्यान प्रत्येक महिन्याला सारखी रक्कम भरली ही रक्कम भरल्यानंतर 1 महिन्याची रक्कम जादा देऊन पैसे परत देणार किंवा 12महिन्याच्या रकमेवर मेकिंग चार्ज न देता दगुणे बनवून देणार होते .

यानुसार फिर्यादी सरोज नरेश चौकसे यांनी आरोपी सराफा व्यापारी अजय गुरव कडे 2लक्ष 39 हजार रुपये जमा केले तसेच यासह इतर ग्राहक असलेले नीलम चौकसे, राजेश चौकसे, आरुष जैस्वाल, माधुरी उमाठे , रेकवार या पाच ग्राहकांनी सुद्धा स्वर्ण योजनेत सहभाग घेऊन नगदी एकूण 19 लक्ष 70 हजार 350 रुपये जमा केले मात्र योजनेनुसार एकूण 22 लक्ष 09 हजार 350 रुपये जमा रक्कमेची परतफेड तसेच दागिने मागायला गेले असता सदर आरोपी सोनाराने टाळाटाळ करीत असल्याने स्वतःची फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच फिर्यादी सरोज चौकसे व अन्य 5 ग्राहकांनी जुनी कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून आरोपी अजय फकिरचंद गुरव वय 48 वर्षे रा सोनार ओली कामठी विरुद्ध कायदेशीर गुन्हा नोंदवीत अटक करीत 17 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

या अटक आरोपिकडे कामठी नगर परिषद चे कर्मचारी सह नगरसेवक तसेच शहरातील कित्येक प्रतिष्ठित नागरिकांची मोठी रक्कम जमा असून जवळपास शहरातील ग्राहकांची करोडो रुपयांची फसवनुक झाल्याचे सांगण्यात येत आहे हे इथं विशेष…

संदीप कांबळे कामठी