Published On : Tue, Mar 24th, 2020

स्वच्छता सर्वेक्षनाणे विहिरी आणि भिंती केल्या सुंदर

नजरेला सुखावणाऱ्या चित्रमय विहिरी आणि भिंती रामटेक(शहर प्रतिनिधी)भारत सरकारचा स्वच्छ सर्वेक्षण 2020 या उपक्रमांतर्गत रामटेक नगरीमध्ये सार्वजनिक ठिकाणांची शोभा वाढवण्यासाठी रंगरंगोटी करण्यात आली. त्यात शाळा महाविद्यालयाची भिंत, सार्वजनिक शौचालय व मुत्रीघर तसेच गार्डन, बालोद्यान, सार्वजनिक विहिरी व अन्य सार्वजनिक ठिकाणे सुशोभित करण्यात आली. त्यामुळे रामटेक शहराची शोभा वाढण्यास मदत झाली.

तसेच नगरपरिषद रामटेक च्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या कुंपणभिंतीला माणुसकीची भिंत तयार करून तेथे ” नको असेल ते द्या व हवे असेल ते घेऊन जा” ही संकल्पना राबविण्यात आली. त्या ठिकाणी गरजू लोकांसाठी जुनी कापड व इतर साहित्य ठेवण्यात येते ज्याचा मोठ्या प्रमाणावर गरजू लोक उपयोग करीत आहेत. भिंतीभिंतीवर लोकोपयोगी संदेश व जाहिराती लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

कोरोनामुळे घरी असलेली मंडळी, जाणती मुलंमुली घरातील खिडकीतून आवारातून या भिंतीवरील पेंटिंग चा आस्वाद घेत आहेत. मुख्य म्हणजे बऱ्याच वार्डातील रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरींची रंगरंगोटी केली असून त्यावर लोकोपयोगी संदेश आणि चित्रही काढले आहे त्यामुळे विहिरीपरिसरातील येजा करणाऱ्याचे नागरिकांचे लक्ष सजलेल्या विहिरींनी वेधले आहे.