Published On : Thu, Mar 30th, 2023
By Nagpur Today Nagpur News

बस्तरवारी -१ जलकुंभाची स्वच्छता मार्च ३१ आणि बस्तरवारी -२ जलकुंभ एप्रिल १ रोजी

नागपूर महानगरपलिका व ऑरेंज सिटी वॉटर सतरंजीपूर झोन जलकुंभ स्वच्छता मोहीम :२०२२-२३
Advertisement

नागपूर,: नागपूर महानगरपलिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी आपल्या स्वच्छ व सुरक्षित पाणीपुरवठा करण्याच्या वचनबद्धतेला अनुसरत दरवर्षीप्रमाणे आपली विशेष वार्षिक जलकुंभ स्वच्छता मोहीम-२०२२-२३ सुरु केलीली आहे. या अंतर्गत सतरंजीपुरा झोन अंतर्गत बस्तरवारी १ जलकुंभ – मार्च ३१ (शुक्रवार) आणि बस्तरवारी-२ जलकुंभ -एप्रिल १ (शनिवार) रोजी स्वच्छ करण्यात येणार आहेत.

नागपूर महानगरपलिका व ऑरेंज सिटी वॉटर दरवर्षीच नागपुरातील सर्व जलकुंभ वर्षातून एकदा स्वच्छता करीत असते. हि परंपरा नागपूर महानगरपलिका व ऑरेंज सिटी वॉटर ने गेल्या २०१२ पासून दरवर्षी नित्यनियमाने सुरु केलेली आहे. सर्व जलकुंभ सकाळी १० ते सायंकाळी ६ दरम्यान, फक्त ८ तासात नागपूर महानगरपलिका व ऑरेंज सिटी वॉटर च्या अत्याधुनिक प्रणाली द्वारे स्वच्छ करण्यात येतात.

या जलकुंभ स्वच्छतेमुळे तेथील भागात दिलेल्या तारखेनुसार पाणीपुरवठा बाधित राहील., टँकर द्वारे देखील पाणीपुरवठा ह्या दरम्यान शक्य होणार नाही .तरीही नागरिकांनी आपल्या परिवाराच्या वापराकरिता पुरेसा पाणी साठा करून ठेवावा हि विनंती

Advertisement

सतरंजीपुरा झोन अंतर्गत बस्तरवारी १ जलकुंभ – मार्च ३१ (शुक्रवार) आणि बस्तरवारी-२ जलकुंभ -एप्रिल १ (शनिवार) रोजी रोजी पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग:

मार्च ३१ (शुक्रवार) बस्तरवारी -१ जलकुंभ : नाईक तलाव , बंगला देश , भारत गॅस , लाल दरवाजा, मुसलमान पुरा, संभाजी कासार, विणकर कॉलोनी, लाड पुरा, नंदा गिरी रोड , कुंभार पुरा, ठक्करग्राम, चंद्रभागा नगर , बापू बसोड चौक , दारव्हेकर दंगल तांडापेठ…

एप्रिल १ (शनिवार) बस्तरवारी-२ जलकुंभ: प्रेम नगर , नारायणपेठ, तेलीपुरा, कौमी बाग नयपूरा , बाहुली विहीर, दलाल पुरा, जसवंत चौक , मिरचीवाला मंदिर, झाडे चौक, खांबाडकर मोहल्ला, सातपुते मोहल्ला , दलालंपूरा , स्वीपर कॉलोनी, पहाडपूररा , कुंभारपूरा , खैरीपुरा , बिडी कारखाना , चाकना चौक …अनुसया माता नगर, नामदेव नगर, किनखेडे ले आउट, बापू अणे नगर, कोलबास्वामी नगर, कुंदनलाल गुप्ता नगर, जोशीपुरा, सोनार टोळी, आनंद नगर, बिनाकी मंगळवारी, वृन्दावन नगर, इंदिरा गांधी नगर, बापू अणे नगर , पोळा मैदान आणि इतर परिसर

ह्या जलकुंभ स्वच्छता शटडाऊन दरम्यान टँकर्सद्वारेही पाणीपुरवठा होणार नसल्याने, मनपा-OCWने नागरिकांना पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

कुठंल्याही प्रकारच्या अधिक माहितीकरिता नागरिक नागपूर महानगरपलिका व ऑरेंज सिटी वॉटर च्या नि:शुल्क मदत क्रमांक १८००- २६६-९८९९ वर संपर्क करू शकतात.