Published On : Wed, Oct 9th, 2019

दिवाणी न्यायालय रामटेक येथे स्वच्छता अभियान संपन्न

स्वच्छ परिसर व स्वच्छ चारित्र्य हीच बापूंना खरी आदरांजली:न्यायाधीश माणिक वाघ

रामटेक : दिवाणी न्यायालय रामटेक येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त दिवाणी न्यायाधीश माणिक ये. वाघ यांच्या अध्यक्षतेखाली व सह दिवाणी न्यायाधीश व्ही. पी.धुर्वे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वच्छता अभियान सप्ताह राबविण्यात आले.यावेळी न्यायालय परिसराची स्वच्छता करण्यात आली.न्यायाधीश महोदयानी स्वतः झाडून परिसर स्वच्छ केला.

याप्रसंगी “झाडूनी स्वच्छ केल्यावर व्यक्तीच्या जसा आजूबाजूचा परिसर स्वच्छ होतो तसा मनातील कचरा देखील साफ करण्याची गरज आहे. एकमेकांविषयीचा राग, द्वेष, नष्ट करुन मनातील मळभ दुर केले तर झगडा न्यायालयात आणण्याची वेळ येणार नाही, आपले चारित्र्य स्वच्छ ठेवावे हीच बापूंना खरी आदरांजली ठरेल” असे न्यायाधीश वाघ यांनी मत व्यक्त केले.

युवकांनी मोठ्या प्रमाणावर अशा उपक्रमांमध्ये सहभाग घ्यावा. तसेच गांधीजींच्या तीन माकडांची शिकवण वाईट पाहू नका,वाईट बोलू नका, वाईट ऐकू नका या तत्वांचा अंगीकार करावा असे विचार दिवाणी सह दिवाणी न्यायाधीश धुर्वे यांनी ह्याप्रसंगी व्यक्त केले. या अभियानात तालुका वकील संघाचे सचिव अँड. महेंद्र येरपुडे,अँड अरुण महाजन,अँड संजीव खंडेलवाल, अँड अपराजित, अँड.बांते, अँड. कारामोरे,अँड. मेश्राम, अँड हटवार, अँड कुंती गडे, अँड स्वाती वाहने हे सहभागी झाले. त्याचप्रमाणे दिवाणी न्यायालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी हिरिरीने सहभाग घेऊन परिसर स्वच्छ करण्यासाठी सहकार्य केले.

स्वच्छता कार्यक्रमाला न्यायालयाचे कर्मचारी पोकळे, एस एच तालेवार, बाजारे, एम व्ही पिंजरकर ,सी एम खापरे,व्ही एम मुळे, आकाश येरपुडे, एच के खडसे , पराते यांनी परिसर स्वछ करण्याकरिता करीता मोलाचे सहकार्य केले. सदर कार्यक्रमास वकील संघाचे वकील, कर्मचारी, न्यायलयीन कर्मचारी, व पक्षकार यांनी ऊत्स्फुर्तपणे सहभाग घेतला.