Published On : Tue, Apr 21st, 2026
By Nagpur Today Nagpur News

व्हिडिओ व्हायरल: नागपूरच्या झांसी राणी चौकातील पेट्रोल पंपावर दोन युवतींमध्ये हाणामारी

किरकोळ वादाचे हिंसक रूप
Advertisement

नागपूर – नागपूरातील झांसी राणी चौक येथील एका पेट्रोल पंपावर दोन युवतींमध्ये झालेल्या हाणामारीची घटना समोर आली असून, किरकोळ वादाने अचानक हिंसक वळण घेतल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला.

मिळालेल्या माहितीनुसार, पेट्रोल पंपावर काही क्षुल्लक कारणावरून दोन्ही युवतींमध्ये वाद सुरू झाला. सुरुवातीला केवळ शाब्दिक चकमकीपुरता मर्यादित असलेला हा वाद काही क्षणांतच हातघाईवर आला. संतापाच्या भरात दोघींनी एकमेकींवर हल्ला करत मारहाण केली.

या घटनेमुळे पेट्रोल पंप परिसरात अफरातफरीचे वातावरण निर्माण झाले. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. काहींनी मध्यस्थी करत दोघींना वेगळे करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याची चर्चा असून, याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.