Published On : Wed, Feb 25th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूरच्या कामठी परिसरात अतिक्रमण हटवताना दोन व्यापाऱ्यांमध्ये हाणामारी; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

नागपूर : कामठी नगर परिषदेकडून अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू असताना दोन व्यापाऱ्यांमध्ये वाद निर्माण होऊन तो थेट मारहाणीपर्यंत पोहोचल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मार्केट परिसरात नगर परिषदेकडून अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवण्यात येत होती. पोलिसांच्या बंदोबस्तात अधिकारी व कर्मचारी अवैध बांधकामांवर कारवाई करत होते. यावेळी संबंधित अतिक्रमणधारकाला साहित्य हटवण्यासाठी सुमारे अर्धा तास मुदत देण्यात आली होती.

Gold Rate
May 22- 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 160,100 /-
Gold 22 KT ₹ 1,48,900 /-
Silver/Kg ₹ 2,71,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दरम्यान, कारवाईदरम्यान दोन व्यापाऱ्यांमध्ये वादाची ठिणगी पडली. एका व्यापाऱ्याने अतिक्रमण हटवताना भेदभाव होत असल्याचा आरोप केला, तर दुसऱ्या व्यापाऱ्याने त्याच्या दुकानाबाबत आक्षेप घेतल्याने दोघांत जोरदार वादावादी झाली. ‘तु-तु, मैं-मैं’ करत सुरू झालेला वाद काही क्षणांतच हाणामारीत बदलला. दोन्ही बाजूंनी लाठ्या-काठ्यांनी एकमेकांवर हल्ला केल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

घटनेवेळी तैनात पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून दोन्ही गटांना वेगळे केले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी जुना कामठी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ उपस्थितांपैकी कुणीतरी मोबाईलमध्ये कैद केला असून तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. प्रशासनाने नागरिकांना अफवा न पसरवण्याचे आणि कायदा हातात न घेण्याचे आवाहन केले आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement