नागपूर : मध्यवर्ती कारागृहात ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी पुन्हा एकदा जेवण देण्याच्या मुद्द्यावरून तीन कैद्यांमध्ये मारामारी झाली. त्यात दोन कैद्यांनी जेवण देणाऱ्या तिसऱ्या कैद्याच्या डोक्यावर भांडी मारत त्याला गंभीर जखमी केले. जखमी कैद्याचे नाव सुमित आनंद राव मून असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमी कैद्याला कारागृहात जेवण वाटपाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर हल्ला करणाऱ्या कैद्यांमध्ये सिद्धेश सतीश घाडगे आणि मनोज प्रकाश वाघमारे यांचा समावेश आहे.
7 ऑगस्ट रोजी सायंकाळी हे दोन्ही कैदी सुमितकडे जेवण घेण्यासाठी आले होते. त्यानंतर सुमितने सिद्धेशला भाजी दिली. काही वेळाने सिद्धेशने हातातली भाजी आणून भाजी भांड्यात टाकली. यावरून सुमित आणि सिद्धेशमध्ये भांडण सुरू झाले.
याच मारामारीत सिद्धेशने त्याचा मित्र मनोजसह सुमितच्या डोक्यावर तेथेच ठेवलेल्या भांड्याने प्रहार केल्याने तो रक्तबंबाळ झाला. त्यानंतर कर्तव्यावर असलेल्या पोलीस सुरक्षा रक्षकांनी धाव घेत सुमितची आरोपीच्या तावडीतून सुटका करून त्याला उपचारासाठी मध्यवर्ती कारागृह रुग्णालयात नेले.
कारागृह प्रशासनाच्या तक्रारीवरून दोन्ही कैद्यांवर धंतोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू केला आहे.