Published On : Thu, Feb 8th, 2024
By Nagpur Today Nagpur News

पंतप्रधान मोदी ‘ओबीसी’ असल्याचा दावा खोटा; राहुल गांधींचा हल्लाबोल

Advertisement

नागपूर : अर्थसंकल्पीय अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण करत असताना स्वतःला सर्वात मोठा ओबीसी असल्याचे म्हटले होते. यावरून आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जातीचा उल्लेख करत त्यांच्यावर हल्लाबोल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःच्या जातीबद्दल चुकीची माहिती पसरवली. पंतप्रधान खुल्या प्रवर्गातील आहेत. ओबीसी प्रवर्गाशी त्यांचा काहीही संबंध नाही, असे गांधी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी प्रवर्गातील जातीत जन्मलेले नाहीत. त्यांचा जन्म गुजरातच्या ‘तेली’ जातीत झाला आहे, अशी माहिती राहुल गांधी यांनी ओडिशा येथील झरसूगुडा येथे बोलताना दिली. या जातीला ओबीसी भाजपाने २००० साली ओबीसी प्रवर्गात टाकले. त्याआधी तेली जात खुल्या प्रवर्गात होती, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.ओबीसी प्रवर्गात जन्मलेले नसल्यामुळे पंतप्रधान मोदी हे खूप आधीपासून जातीनिहाय जनगणनेला विरोध करत आले आहेत. कारण ते खुल्या प्रवर्गाचे प्रतिनिधित्व करतात, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

दरम्यान राहुल गांधी आज भारत जोडो न्याय यात्रा ओडिशामधील टप्पा पूर्ण करून छत्तीसगड राज्यात प्रवेश करणार आहे. नोव्हेंबर २०२३ मध्ये विधानसभा निवडणुका झाल्यानंतर राहुल गांधी यांचा छत्तीसगडमधील हा पहिलाच दौरा आहे. तर १४ फेब्रुवारी रोजी बलरामपूर येथून ही यात्रा झारखंडच्या दिशेने निघेल.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.