Published On : Sun, Mar 21st, 2021

जीव धोक्यात घालून पवनी च्या रोडवर चालतात नागरिक

रोडवरचे दगळ उचलावे व जिथे काम सुरु आहे तिथ दिशा दर्शक बोर्ड लावावे योगेश बावनकर यांची मागणी


पवनी : पवनी ह्या शहरात पाइपलाइन चे काम सुरु असून हा काम पूर्ण वार्ड मध्ये सुरु आहे काही वार्ड मधील काम पूर्ण झाला आहे तर काही वार्ड मधील काम सुरु आहे. पाइपलाइन चा काम हा रस्ता फोडून करा लागत असून काम पूर्ण झाल्या नंन्तर त्या ठिकाणी माती व रस्त्याचे दगळ त्यावर टाकत आहेत व रस्त्यावर ज्याठिकानी काम केला त्यावर दगळ जास्त प्रामाणात व मोठे दगळ ठेवल्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

रोड वर चारचाकी व दोन चाकी वाहन चालत असतानी लोकांना रोडवरचे दगड नागरिकांना लागून प्राण देखील जाऊ शकते व रोडवर दगळ असल्याने रोडवर ट्रॉफिक देखील होते व तसेच रोड वर छोटे व मोठे दगड असल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून रोडवरच्या दगडामुळे नागरिकांना स्वतःचे जीव धोक्यात घालून रोडवर जावे लागत आहे.

पाईपलाईन चे काम काही ठिकाणी सुरू असून ज्या ठिकाणी काम सुरू आहे त्या ठिकाणी दिशादर्शक बोर्ड लावण्यात आले नाही आहे त्यामुळे तिथं दिवसा किंवा रात्री अपघात होऊन नागरिकांचे प्राण देखील जाऊ शकते प्रशासनाने याकडे लक्ष देऊन दिशादर्शकाची बोर्ड व रोडवरचे दगड उचलून योग्य ते मार्गी लावावे अशी मागणी योगेश बावनकर यांनी प्रसार माध्यमातून केली आहे