
नागपूर : महा मेट्रोत नोकरी लावून देणार या भूल थापा देत फसवणुकीचे प्रकार नागपुरात होत असल्याचे चित्र असल्याने या प्रकारांपासून सर्व सामान्य नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन महा मेट्रो तर्फे करण्यात येत आहे.
महा मेट्रो तर्फे या संबंधाने सातत्याने पाठ पुरावा करत नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्याचे प्रयत्न होत असतात. या संबंधाने मेट्रो तर्फे बातम्या देखील दिल्या आहेत. मेट्रो तर्फे पदभरती होत असतांना त्या संबंधीची सर्व माहिती महा मेट्रोची वेबसाईट www.mahametro.org व प्रतिष्ठित वर्तमान पत्रांमध्ये प्रकाशित केल्या जाते. त्यामुळे पदभरती संबंधी कुठलीही माहिती मिळाल्यास याची संपूर्ण शहानिशा महा मेट्रोची ऑफीशीयल वेबसाईट (संकेत स्थळ) किंवा मेट्रो भवन कार्यालयातून करावी तसेच टोल फ्री क्रमांक : १८००२७००५५७ वर संपर्क साधावा. असे आव्हान महा मेट्रो, नागपूर तर्फे नागरिकांना केले जात आहे.
मेट्रोत नोकरी लावून देतो असे म्हणत फसवणुकीचे प्रकार या आधी नागपुरात घडले असून त्या प्रकरणात अनेक पोलीस तक्रार देखील झाली आहे. या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करत जागरुक राहून सर्व सामान्य नागरिकांनी,विशेषतः तरुणांनी अश्या भूलथापांना किंवा अफवांना बळी पडू नये हे आवाहन महा मेट्रो तर्फे केले जात आहे.
पाचपावली में अवैध कत्लखाने का पर्दाफाश #NagpurNews #Panchpaoli #PoliceAction #CrimeNews #newsupdate
पेपर लीक पर सख्त कानून, ठाकरे बंधुओं पर तंज #Bawankule #NagpurNews #PoliticalNews...
नागपुर के एमआईडीसी थाना क्षेत्र में मोबाइल दुकान में चोरी #nagpurnews #crimenews...
हुड़केश्वर पुलिस की कस्टडी से कुख्यात चोर फरार #nagpurnews #crimenews #accused #newsupdate
नागपुर में दिव्यांगजनों को मिला नया सहारा #HyundaiMobisIndia #DisabilitySupport #NGO #NagpurNews
उद्धव ठाकरे के जन्मदिन पर नागपुर में भव्य महाआरती #UddhavThackeray #nagpurnews #news...




