Published On : Sat, Sep 25th, 2021

दीनदयालजी उपाध्याय जयंतीनिमित्य मोफत लसीकरण शिबिरात नागरिकांचा उस्फुर्त सहभाग

काल 25 सप्टेंबर रोजी पंडित दिनदयालजी उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्याने व सेवा समर्पण अभियान अंतर्गत भाजप वैद्यकीय आघाडी नागपूर महानगर द्वारा चरडे चाईल्ड क्लिनिक येथे राज्यसभा खासदार पद्मश्री डॉ विकासजी महात्मे सर यांच्या उपस्थितीत पं दीनदयालजी उपाध्याय यांच्या प्रतिमेस माल्यार्पण व पुष्पार्चन करण्यात आलं.

यावेळी दीनदयाल यांच्या जीवनकार्याविषयी, मानवता व अंत्योदयाचा मार्ग या विषयावर डॉ महात्मे यांनी मार्गदर्शन केलं.या कार्यक्रमास प्रमुख अतिथी सभापती नगरसेविका सौं श्रद्धा पाठक, महिला आघाडी अध्यक्षा सौं रेखाताई निमजे प्रामुख्याने उपस्थित होत्या.

या जयंतीच्या निमित्याने वैद्यकीय आघाडी व महात्मे आय बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिबिरात 127 नागरिकांचं मोफत लसीकरण करण्यात आलं . कोविड काळात ईश्वरीय सेवाकार्य करणाऱ्या डॉक्टर्स व परमेडिकल स्टाफव मनपा सफाई कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी आघाडीचे शहर महामंत्री डॉ श्रीरंग वराडपांडे, मध्य नागपूर अध्यक्ष डॉ प्रांजल मोरघडे,डॉ छाया दुरुगकर, डॉ प्रणय चांदेकर,श्री राहुल यावलकर, युवा मोर्चाचे हरीश निमजे, अश्विन निमजे, जयकिशन हेडाऊ आदी आघाडीचे आदी पदाधिकारी उपस्थित होते.