Published On : Mon, Nov 22nd, 2021

Video : भाजपाला धक्का, नगरसेवक छोटू भोयर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, बावनकुळेंविरुद्ध लढणार

नागपूर : भाजपाचे (BJP) बंडखोर नगरसेवक छोटू भोयर (Chotu Bhoyar)यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ते नागपूर स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) याच्याविरुद्ध काँग्रेसतर्फे (Congress) मैदानात उतरणार आहेत. हा निवडणुकीआधी भाजपाला मोठा धक्का आहे. ( Chotu Bhoyar joins Congress)

Advertisement
Advertisement

रवींद्र उर्फ छोटू भोयर हे भाजपा सोडण्याच्या तयारीत आहेत, अशी चर्चा होती. आज (सोमवारी) त्यांनी भाजपाचा राजीनामा दिला आणि काँग्रेसतर्फे नागपूर स्वराज्य संस्था मतदारसंघातून लढण्याची घोषणा केली.

Advertisement

अन्याय झाला

Advertisement

सकाळी प्रसामाध्यमांशी बोलताना भोयर म्हणालेत, भाजपात माझ्यावर अन्याय झाला. मी विधानसभेचे तिकीट मागितले होते; मिळाले नाही. विधान परिषदेचे तिकीट देण्याचे आश्वासन दिले होते; दिले नाही. म्हणून मी भाजपा सोडतो आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement