Published On : Tue, Sep 22nd, 2020

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ विचारवंत डॉ. भाऊ लोखंडे यांना श्रद्धांजली

Advertisement

उत्तम भाष्यकार, चळवळींच्या क्षेत्रातील गाढा अभ्यासक गमावला

मुंबई :- महाराष्ट्राच्या सामाजिक, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील चळवळींचा गाढा अभ्यासक आपण गमावला आहे, अशी श्रद्धांजली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ विचारवंत डॉ.भाऊ लोखंडे यांना वाहिली आहे.

मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, डॉ. लोखंडे यांनी आंबेडकरी विचार, बौद्ध वाड़:मय यांच्या संशोधन-लेखनातून अभ्यासक म्हणून मोठे योगदान दिले आहे.विदर्भ साहित्य संघासह अनेक संस्था, संघटनांच्या माध्यमातून ते साहित्य-संस्कृती क्षेत्रात सक्रिय होते.

आंबेडकरी , दलित आणि बौद्ध विचार चळवळींचे भाष्यकार म्हणून त्यांनी राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय स्तरावरही अभ्यासू मांडणी केली आहे.

Advertisement

डॉ. लोखंडे यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील चळवळींचा गाढा अभ्यासक आपण गमावला आहे. ज्येष्ठ विचारवंत डॉ. भाऊ लोखंडे यांना विनम्र श्रद्धांजली.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.