Published On : Tue, Apr 2nd, 2024
By Nagpur Today Nagpur News

मुख्यमंत्री शिंदेंनी कृपाल तुमानेंचे तिकीट कापले,आता ४० गद्दारांनी पुढचा विचार करावा;आदित्य ठाकरेंचे नागपुरात टीकास्त्र

Advertisement

नागपूर :एकनाथ शिंदेंनी विद्ममान खासदाराचं तिकीट कापत काँग्रेसमधून आयात नेत्याला उमेदवारी दिली आहे. तिकीट कापण्यात आलेल्या विद्ममान खासदाराचे नाव कृपाल तुमाने आहे. यावरून शिवसेनेचे नेते (ठाकरे गट) आदित्य ठाकरे यांनी नागपुरात प्रसार माध्यमांशी भाष्य करत शिंदे गटावर हल्लाबोल केला.

आदित्य ठाकरे हे यवतमाळचे उमेदवार संजय देशमुख यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नागपुरात आले असता पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.यवतमाळमध्ये महायुतीकडून अजून उमेदवार दिला नाही. इतर पक्षातून आयात केलेले भ्रष्ट उमेदवारांना किंवा भाजपच्या उमेदवारांसाठी ती जागा सोडण्यात येणार आहे.

दिल्ली, बिहार, महाराष्ट्र, बंगाल अशी इंडिया आघाडीची बांधणी मजबूत असल्याचे दिसून येत आहे.सर्वसामान्य जनता आमच्या पाठीशी उभी आहे. देशात लोकशाहीचा गळा आवळला जात असून याच परीस्थितीत आम्ही सर्व एकजूट होत या अन्यायाविरोधात मैदानात उतरलो आहोत.
आमच्या लढाईत त प्रकाश आंबेडकर यांनाही सहभागी होण्याचे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.