नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केलेल्या भाषणादरम्यान बहुचर्चित लाडकी बहीण योजनेवर भाष्य केले. आम्ही जी आश्वासनं दिली आहेत, ती आम्ही पूर्ण करणार आहोत. कुणीही मनात शंका ठेऊ नये. लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे, असं फडणवीस यांनी यावेळी सभागृहात म्हटले.
आमची एकही योजना बंद होणार नाही, लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे. अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणींना डिसेंबरचे पैसे मिळणार आहेत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
दरम्यान पुढे बोलताना त्यांनी म्हटले की या योजनेच्या कोणत्याही निकषात बदल करण्यात आलेले नाही. आपण ज्यांनी अर्ज केला त्या सर्वांना पैसे देत आहोत.
दरम्यान लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात आतापर्यंत दर महिन्याला 1500 रुपये याप्रमाणे पाच हपते जमा झाले आहेत. मात्र विधानसभा निवडणुकीदरम्या महायुतीने जाहीर केलेल्या जाहीरनाम्यात बहिणींना दिल्या जाणारी ही रक्कम वाढवून 2100 रुपये करण्यात आली आहे.