Advertisement
मुंबई: बदलापूर येथील आदर्श शाळेत दोन चिमुकल्या विद्यार्थींनीवर अत्याचार झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज (दि. २० ऑगस्ट) हजारो बदलापूरकरांनी संताप व्यक्त करत आंदोलन केले.या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांनी नराधमावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. बदलापूरमध्ये झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. ज्या नराधमाने हे दुर्दैवी कृत्य केले आहे, त्याला कठोर शिक्षा करण्यात यावी.
तसेच प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात घेऊन यावर तात्काळ दोषींवर कारवाई करावी,असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.
तसेच अशाप्रकारच्या घटना यापुढे होऊ नये, म्हणून संस्था चालक, शाळा या सर्व लोकांवर एक नियमावली तयार केली जाईल, असेही शिंदे म्हणाले आहेत.