Published On : Tue, Mar 12th, 2024
By Nagpur Today Nagpur News

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नागपूर-चंद्रपूर दौऱ्यावर

Advertisement

नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मंगळवारी नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दुपारी 4.30 वाजता ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावर उतरतील आणि हेलिकॉप्टरने चंद्रपूरला रवाना होती.

मुख्यमंत्री सायंकाळी पाच वाजता चंद्रपूर येथील मोरवा विमानतळ हेलिपॅडवर पोहोचतील. त्यानंतर कारने फॉरेस्ट अकादमी चंद्रपूरकडे रवाना होतील.

यानंतर संध्याकाळी 6 वाजता ते अटलबिहारी वाजपेयी बोटॅनिकल गार्डनची पाहणी करतील.फिरत्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करतील.

शिंदे यांच्या हस्ते सायंकाळी ७ वाजता चंद्रपूर जिल्ह्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजन,लोकार्पण व उद्घाटन होणार असून रात्री १०.१५ वाजता ते मुंबईहून नागपूरकडे प्रयाण करतील.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.