Published On : Mon, Mar 5th, 2018

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला एमकेसीएलच्या कामकाजाचा आढावा

Advertisement

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (एमकेसीएल) कामकाजाचा आढावा घेण्यात आला.

मुख्य सचिव सुमित मल्लिक, अप्पर मुख्य सचिव मुकेश खुल्लर, वित्त विभागाचे प्रधान सचिव आर. ए. राजीव, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव आर. श्रीनिवासन, एमकेसीएलचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर, व्यवस्थापकीय संचालक विजय सावंत, आदी उपस्थित होते.

यावेळी विजय सावंत यांनी एमकेसीएलच्या कामकाजासह महालाभार्थी, महाडेस्कटॉप आणि महासॉफ्टचे सादरीकरण केले. एमकेसीएल हे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान, उद्योग, भागीदारी, सामाजिक उत्तरदायित्व आणि शिक्षणशास्त्र या पाच वैशिष्ट्यांवर अवलंबून असून एमकेसीएल हे थ्री-डी (डिस्कव्हरी-डिमांड-डिलिव्हरी) वर काम करीत आहे. राज्य शासनाच्या सर्व विभागांमध्ये एमकेसीएलच्या महालाभार्थी, महाडेस्कटॉप आणि महासॉफ्ट प्रणालीचा कामकाजात कसा वापर होईल, यादृष्टीने श्री. सावंत यांनी सादरीकरणातून माहिती दिली.