नागपूर : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात GYAN म्हणजेच गरीब, युवा, अन्नदाता आणि नारी शक्ती यावर सरकारने लक्ष केंद्रित केले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिली. प्राप्तिकराची करपात्र उत्पन्न मर्यादा ७ लाखांवरून तेट १२ लाखांपर्यंत नेली आहे. त्यामुळे प्राप्तिकराच्या या रचनेचा मोठा फायदा मध्यमवर्गीयांना, नोकरदारांना, नवतरुणांना होणार आहे.
यामुळे मध्यमवर्गीयांच्या खिशात रक्कम राहणार आहे. त्यातून बाजारपेठेतील मागणी वाढू शकेल. त्यातून सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योगांना फायदा होऊ शकेल. हा अतिशय बोल्ड असा निर्णय आहे. हा निर्णय भारताच्या आर्थिक विकासातला मैलाचा दगड ठरेल, असे फडणवीस म्हणाले.