Published On : Sun, Jan 20th, 2019

भारतीय विद्याभवन संस्कार व शिक्षणाचे केंद्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Advertisement

नागपूर : भारतीय विद्याभवन हे संस्कार व शिक्षणाचे केंद्र असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.वर्धा रोडवरील चिचभुवन येथील भारतीय विद्याभवनच्या प्राथमिक व माध्यमीक इमारतीच्या भुमीपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी तामीळनाडूचे राज्यपाल व भारतीय विद्याभवनचे विश्वस्त व अध्यक्ष बनवारीलाल पुरोहीत, केंद्रीय भुपृष्ठ व परिवहन मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर, राजेंद्र पुरोहीत, महाराष्ट्र विमानपत्तन प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी, संचालक श्रीमती अन्नपुर्णी शास्त्री उपस्थित होते

शिवणगाव व परिसरातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना भारतीय विद्याभवनच्या प्रस्तावित शाळेत चांगले व दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध झाल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.शिक्षणक्षेत्रात विद्याभवनच्या माध्यमातुन बाबुजी व त्यांची टीम उत्तम पध्दतीने काम करत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. जागा मिळाल्यानंतर तीन दिवसात शाळेच्या इमारतीचे काम सुरू झाले आहे यावरून कामाविषयीची प्रतीबध्दता दिसून येते. विद्याभवन मध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेश झाला की, त्यांच्या जीवनात परिवर्तन होते . उत्तम नागरीक होण्याचा त्याचा प्रवास सुरू होतो असेही ते म्हणाले.

Gold Rate
10 May 2025
Gold 24 KT 94,700/-
Gold 22 KT 88,100/-
Silver/Kg 96,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

विद्याभवनच्या शाळांमध्ये शिक्षण हक्क कायद्याची चांगली अमंलबजावणी होत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगीतले . मिहान प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना या शाळेत प्रवेशाला प्राधान्य असणार असल्याचे ही आश्वस्त केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी उत्तम शैक्षणीक सुविधांसह चांगली इमारत उभी राहावी. अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

संस्कृत या भाषेसह ज्ञान विज्ञानासह परंपरेची व उत्तम संस्कार देण्याची विद्याभवनची परंपरा असल्याचे केंद्रीय भुपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांनी सांगीतले. शिक्षणाचे आज व्यापारीकरण झाल्याचे दिसते. मात्र विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देणारी विद्याभवनची परंपरा असल्याचे सांगीतले. देशाला चारित्र्यवान नागरीक देण्याचे काम विद्याभवन करत असल्याचे त्यांनी सांगीतले.

भारतीय विद्याभवनची स्थापना 1938 मध्ये कुलपती के.एम.मुंशी यांनी केल्याचे सांगुन बनवारीलाल पुरोहित म्हणाले की, आज राजेंद्र पुरोहीत,भवनच्या देशात व विदेशात 400 हून अधिक शैक्षणीक संस्था आहेत. दोन लाखाहून अधिक विद्यार्थी यात शिक्षण घेत आहे. वटवृक्षासारखा संस्थेचा विस्तार होत आहे.

सुसंस्कारीत पिढी घडवण्याच्या ध्येयाने विद्याभवनचे शिक्षक कार्य करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

Advertisement
Advertisement