नागपूर : इतिहासाच्या दृष्टीने प्रत्येक दिवसाचे महत्त्व असते. फेब्रुवारी महिन्यातील 19 तारीख ही अनेक महत्त्वाच्या घटनांची साक्षीदार आहे. यातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आजच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवनेरी किल्यावर जन्म झाला.यापार्श्वभूमीवर नागपुरातील 75 च्या वर संघटना एकत्रितपणे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करणार आहेत.
मराठा सेवा संघ लॉंन, भाऊसाहेब सुर्वे नगर, जयताळा येथे १९ फेब्रुवारीला सायंकाळी ५ वाजता हा उत्साह साजरा करण्यात येईल.. या कर्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक म्हणून प्रा. श्याम मानव, संघटक, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती हे लाभले आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षपद पद्मश्री डॉ सुखदेव थोरात भूषवणार आहेत. प्रसिद्ध व्याख्याता प्रा. डॉ. वैशाली डोळस व जमाते इस्लामे हिंद चे अध्यक्ष जनाब खाँजा इजहार अहमद यांचे ही मार्गदर्शन नागरिकांना लाभेल.
शिवाजी महाराजांचे रयतेच राज्य म्हणजे ज्यात देशातील अठरा पगड जातींना जोड़ून स्थापित केलेले असे कल्याणकारी ‘शिवराज्य’ होते. आधुनिक काळात संविधानाने स्वातंत्र्य, समता, बंधुता व सामाजिक न्यायद्वारे भारतीय समाजाला एकत्र बांधून हे राष्ट्र निर्माण केले. हा विचार सर्व जनमानसात रूजवणे हे अत्यंत गरजेचे आहे. या दृष्टिने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती नागपूरातील सर्व धर्मीय, समविचारी, सामाजिक व सांस्कृतिक संघटनानीं एकत्रित येऊन उत्साहाने साजरी करणे वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे.
या सोबतच जयंती दिनी दुपारी ४:३० वाजता छत्रपति शिवाजी चौक ते कार्यक्रम स्थळी भव्य शीव रॅली चे आयोजन केले आहे. या जयंती कार्यक्रमास सर्व कुटुंब व मित्र-परिवारासह उपस्थित राहून राष्ट्रनिर्माणा च्या कार्याला आपले नैतिक कर्तव्य समजून हातभार लावावा व मोठ्या संखेने उपस्थित राहावे असे आवाहन फेडरशन ऑफ़ आर्गेनाईजेशन फॉर सेक्यूल्यारिस्म, सोशल जस्टिस एंड डेमोक्रेसीच्या वतीने करण्याल आले.