Published On : Fri, Jun 11th, 2021

मुख्यमंत्री सहायता निधी कोविड-19 साठी महावितरण, महानिर्मितीकडून धनादेश मुख्यमंत्री यांच्याकडे सुपूर्द

Advertisement

मुंबई: मुख्यमंत्री सहायता निधी (कोविड-19) साठी महावितरण आणि महानिर्मितीकडून अनुक्रमे 5 कोटी 17 लाख 34 हजार 631 रुपये आणि 1 कोटी 2 लाख 71 हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सुपूर्द केला.

सह्याद्री राज्य अतिथीगृहात धनादेश सुपूर्द करण्यात आले. यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी महावितरण आणि महानिर्मितीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे या योगदानाबद्दल प्रशंसा केली आहे. कोविड-१९ च्या संकटात हे सर्व अधिकारी, कर्मचारी वीज पुरवठा अखंडीत रहावा आणि आव्हानात्मक परिस्थितीतही सदैव सज्ज राहीले आहेत. यातूनही त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत योगदान देण्याची संवेदनशीलता दाखविली आहे, जी कौतुकास्पद आहे.

यात महावितरणच्या अधिकारी, कर्मचारी यांच्या एक दिवसाच्या वेतनातून पाच कोटी १७ लाख ३४ हजार ६५० व महानिर्मितीच्या अधिकारी व कर्मचाऱी यांच्या एक दिवसाच्या वेतनातून १ कोटी २ लाख ७१ हजार रुपयांचे योगदान एकत्रित करण्यात आले. हे योगदान धनादेशाच्या रुपात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-१९ साठी देण्यात आले आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी -कोविड-19

Advertisement

मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड-19 हे स्वतंत्र बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आले आहे. त्याचा बचत खाते क्रमांक 39239591720 आहे.

खात्याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.

Chief Minister’s Relief Fund-COVID 19
Savings Bank Account number 39239591720
State Bank of India,
Mumbai Main Branch,
Fort Mumbai 400023
Branch Code 00300
IFSC CODE- SBIN0000300

मराठीत-
मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड 19
बँकेचे बचत खाते क्रमांक- 39239591720
स्टेट बँक ऑफ इंडिया,
मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023
शाखा कोड 00300
आयएफएससी कोड SBIN0000300
सदर देणग्यांना आयकर अधिनियम 1961 च्या 80 (G) नुसार आयकर कपातीतून 100 टक्के सूट देण्यात येते.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.