Published On : Thu, Jun 28th, 2018

मुंबईच्या घाटकोपर येथे चार्टर्ड विमान कोसळल; पाच जणांचा मृत्यू

मुंबई : मुंबईचा घाटकोपर पश्चिमेकडील जीवदया लेन परिसरातील भर वस्तीत चार्टर्ड विमान कोसळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेत विमानातील चार जणांसह एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.

Advertisement
Advertisement

दुपारी दीडच्या सुमारास ही दुर्घटना घडली. कोसळलेलं हे विमान व्हीटी यूपीझेड, किंग एअर सी-90 हे चार्टर्ड विमान यूपी सरकारचं खासगी विमान होतं.

Advertisement

या विमानात वैमानिकासह अन्य तिघे जण असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून बचावकार्याला सुरुवात करण्यात आली. हे विमान कुठल्या कारणाने कोसळलं याबाबतची माहिती मात्र उपलब्ध झालेली नाही.

Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement