Published On : Fri, Nov 25th, 2022

प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे शनिवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.

– संघटनात्मक व सामजिक बैठकांना उपस्थिती

भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार श्री चंद्रशेखर बावनकुळे हे शनिवार 26 नोव्हेंबरला सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत. दोन दिवस कोंकण दौऱ्याची ते सिंधुदुर्ग येथे सांगता करणार आहेत. प्रदेशाध्यक्ष श्री बावनकुळे यांचा हा प्रवास संघटनात्मक बांधणी व भेटी यासाठी आहे.

प्रदेशाध्यक्ष श्री बावनकुळे यांचे शनिवारी 26 नोव्हेंबरला सकाळी 11.वा. कणकवली शहर येथून सिंधुदुर्ग भाजपाच्या वतीने बाईक रॅली काढून स्वागत केले जाईल. दुपारी 11.45 वा. भगवती हॉल कणकवली येथे संघटनात्मक बैठक व मेळाव्यात सहभागी होत भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील.

दुपारी 03.45 वा. माध्यमिक पतपेढी हॉल ओरास येथे धन्यवाद मोदीजी या कार्यक्रमात उपस्थित राहून केंद्र सरकारच्या योजनेतील लाभार्थ्यांशी संवाद साधतील.

सायंकाळी 04.45 वा. कुडाळ नजिक नवमतदार नोंदणी अभियान कार्यक्रमास उपस्थित राहतील. सायंकाळी 05.30 वा. सावंतवाडी येथे सामाजिक कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

त्यांच्या या दौऱ्यात भाजपाक्या विविध संघटनात्मक बैठकीत सहभागी होतील. यात बूथ कमिटी बैठक, कोअर कमिटी सदस्यांशी चर्चा, युवा वॉरियर्स शाखा उद्घाटन, सोशल मीडिया बैठकीला उपस्थित राहतील.

त्यांच्या या दौऱ्यासाठी रत्नागिरी भाजपा, भाजयुमो, महिला आघाडीचे अध्यक्ष व पदाधिकारी प्रयत्न करीत आहेत.