Published On : Sun, May 26th, 2019

नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणूक पालकमंत्र्यांनी घेतल्या 147 प्रचार बैठका

Advertisement

नऊ जाहीरसभा व मेळाव्यांना उपस्थिती

नागपूर: लोकसभा निवडणुकांचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना मतदारांनी नेत्रदीपक विजय मिळवून दिला आहे. विदर्भातही मतदारांचा कल महायुतीकडेच असल्याचे या निकालांनी सिध्द केले. विदर्भात प्रतिष्ठेची असलेली नागपूर, तसेच भंडारा गोंदिया व रामटेक या तीन लोकसभा मतदारसंघाचे क्लस्टर प्रमुख म्हणून राज्याचे ऊर्जामंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे जबाबदारी होती. या तीनही मतदारसंघातील भाजपा-सेना महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. या तीनही मतदारसंघात पालकमंत्री बावनकुळे यांनी प्रचारात स्वत:ला अगदी झोकून दिले होते. प्रचारादरब्यान बावनकुळे यांनी 147 प्रचार बैठका, नऊ जाहीरसभा व कार्यकर्त्यांचे, महिलांचे मेळावे घेऊन प्रचाराची धुरा सांभाळली.

गेल्या 26 मार्चपासून ते प्रचार संपेपर्यंत म्हणजे 9 एप्रिलपर्यंत पालकमंत्री बावनकुळे यांनी बैठकी आणि नागरिकांशी संपर्काचा सपाटाच लावला. या दरम्यान नागपूर शहरातील सहाही विधानसभा, जिल्ह्यातील सर्व विधानसभा आणि भंडारा गोंदियातील सहाही विधानसभा मतदारसंघात संबंधित आमदारांना सोबत घेऊन या बैठकी घेण्यात आल्या. तीनही मतदारसंघ पालकमंत्र्यांनी प्रचारासाठ़ी पिंजून काढले. सकाळी 8 वाजता सुरु झालेला प्रचार दौरा रात्री 10 वाजता प्रचार संपल्यानंतरच पूर्ण होत होता. 26 मार्चला भंडार्‍यात 9 बैठका, 27 ला रामटेक दौरा ग्रामीण भागात जनतेशी संपर्क,सायंकाळी नागपुरात 3 सभा, कार्यकर्त्यांचा मेळावा, मध्य नागपुरात 3 बैठकी, 28 मार्चला सकाळी रामटेक तालुका, दुपारी काटोल तालुक्यात 12 बैठकी, काटोल शहरात 4 बैठकी, रात्री पेजप्रमुखांचा मेळावा.

मार्च 29 ला भंडारा गोंदिया मतदारसंघात 8 बैठकी, तुमसरला 3 बैठकी, दुपारी काटोल शहर कार्यकर्त्यांची बैठक, सायंकाळी नागपुरात पेजप्रमुखांचा मेळावा, दक्षिण नागपुरात पक्षाच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन व 4 बैठकी व पेजप्रमुखांचा मेळावा, 30 मार्चला पश्चिम नागपुरात 2 बैठकी, रात्री कार्यकर्त्यांच्या 3 बैठकी, दरम्यान सकाळी उमरेड प्रचार दौर्‍यात 10 बैठकी, 31 मार्च रोजी सकाळी नागपुरात 2 बैठकी, गोंदिया तिरोडा दौर 9 बैठकी. या दरम्यान धार्मिक कार्यक्रम व विविध कार्यक्रमांना उपस्थित राहून नागरिकांशी पालकमंत्री संवाद साधत होते. 1 एप्रिल रोजी भंडारा जिल्ह्यातील साकोली व लाखनी येथे प्रचार दौर्‍यादरम्यान 12 बैठकींमध्ये पालकमंत्र्यांनी कार्यकर्ते आणि नागरिकांना संबोधित केले. 2 एप्रिल रोजी सायंकाळी सावनेर येथे मुख्यमंत्र्यांच्या जाहीरसभेत उपस्थित व त्यानंतर उत्तर नागपुरात कार्यकर्त्यांच्या 4 बैठकी, 3 एप्रिल रोजी बेसा बेलतरोडी येथे 7 बैठकी, टिमकी येथे नागरिकांशी वार्तालाप व गोंदिया येथे पंतप्रधानांच्या जाहीरसभेला उपस्थिती.

एप्रिल 4 रोजी कोराडी-महादुला व कामठी शहर येथे कार्यकर्त्यांच्या 6 बैठकी घेण्यात आल्या. त्यानंतर दक्षिण पश्चिम नागपुरात 7 बैठकी व नागरिकांसोबत चर्चा. 5 एप्रिल रोजी दक्षिण पश्चिम नागपुरात प्रचार अभियान राबविण्यात आले. सायंकाळी तुमसर येथे मुख्यमंत्र्यांच्या प्रचारसभेत उपस्थिती. 6 एप्रिलला कोराडी महादुला येथे कार्यकर्त्यांच्या 5 बैठकी आणि कामठी शहर व तालुक्यात 9 बैठकी पालकमंत्री बावनकुळे यांनी घेतल्या. 7 एप्रिल रोजी हुडकेश्वर नरसाळा पिपळा या भागातील कार्यकर्त्यांच्या व नागरिकांच्या 9 बैठकी घेतल्या. धानला मौदा येथील मुख्यमंत्र्यांच्या जाहीरसभेला उपस्थिती. कन्हान येथे उध्दव ठाकरे यांच्या जाहीरसभेलाही उपस्थिती. यानंतर प्रचार संपुष्टात आला.

या निवडणुकीत तीनही मतदारसंघात पालकमंत्री बावनकुळे यांनी प्रचारात स्वत:ला गुंतवून घेतले होते. या शिवाय पक्षाच्या निर्देशानुसार अन्य कार्यक्रमांवरही त्यांचे नियंत्रण होते. अत्यंत नियोजनबध्द प्रचाराचा कार्यक्रम त्यांनी या निवडणुकीत राबवून या तीनही जागा निवडून येण्यासाठी जीवाचे रान केले.