३ जानेवारीला चंद्रशेखर बावनकुले जिलाधिकाऱ्यांची भेट घेणार

शेतकऱ्यांना नुक्सान भरपाई मिळावी ही मांगनी करणार

नागपुर-शुक्रवार दिनांक ३ जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्ष जिल्हा प्रमुख पदाधिकार्‍यांचे एक शिष्टमंडळ जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरु असलेल्या वादळी वारा आणि पाऊस व गारपिटीने शेतकर्‍यांच्या पिकांच्या झालेल्या प्रचंड हानीची नुकसान भरपाई त्वरित मिळावी या मागणीसाठ़ी जिल्हाधिकार्‍यांची भेट घेणार आहे. नुकसानीचा सर्वे त्वरित करून शासनाने त्वरित शेतकर्‍यांना मदत करावी ही मागणी करण्यात येणार आहे.