Published On : Mon, Jul 8th, 2019

चंद्रपूर: मेटेपारजवळ वाघिणीसह २ बछड्यांचा मृत्यू

Advertisement

राज्यात वन्यजीवांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला असतानाच, चिमूर वनपरिक्षेत्रातील मेटेपार गावाजवळ वाघिणीसह तिचे दोन बछडे मृतावस्थेत आढळल्यानं खळबळ उडाली आहे. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली असून, त्यांचा मृत्यू कशामुळे झाला याचा शोध घेण्यात येत आहे.

मेटेपार गावालगतच्या तलावाजवळ काही जण सोमवारी सकाळी जांभळं तोडण्यासाठी गेले होते. त्यावेळी वाघीण आणि तिचे दोन बछडे मृतावस्थेत पडल्याचे त्यांनी पाहिले. दोन्ही बछडे साधारण आठ ते नऊ महिन्यांचे आहेत. ही माहिती परिसरात पसरताच, गावकऱ्यांनी मृत वाघीण आणि बछड्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी केली. काही ग्रामस्थांनी याबाबतची माहिती तरूण पर्यावरणवादी मंडळाला दिली. त्यांनी वन अधिकाऱ्यांना कळवले.

Advertisement
Advertisement

वन अधिकारी आणि संस्थेचे कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पाहणी केली असता तेथून थोड्या अंतरावर एक चितळ मृतावस्थेत सापडले. वाघीण आणि बछड्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे आताच सांगता येणार नाही. शवविच्छेदनानंतरच त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येईल, असंही त्यांनी सांगितलं.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement