Published On : Fri, Apr 21st, 2017

चंद्रपूर महापालिका निवडणुकीचा अंतिम निकाल आणि विश्लेषण

Advertisement

Chandrapur
चंद्रपूर:
चंद्रपूर महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागला आहे. यात भाजपनं एकहाती सत्ता मिळवली आहे. 66 जागांपैकी 38 जागांवर विजय मिळवत भाजपनं स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. तर गेल्या निवडणुकीत 26 जागा घेऊन क्रमांक एक वर असलेल्या काँग्रेसचा या निवडणुकीत सफाया झाला असून त्यांना केवळ 12 जागांवर समाधान मानाव लागलं आहे. तर बीएसपीनं 8 जागा जिंकत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.

जाणून घेऊया कुणाला मिळाल्या किती जागा?

एकूण जागा – 66
भाजप – 38
काँग्रेस – 12
बीएसपी – 08
शिवसेना – 02
राष्ट्रवादी काँग्रेस – 02
मनसे – 02
प्रहार – 01
अपक्ष – 01

ही निवडणूकही सुधीर मुनगंटीवर यांच्या नेतृत्वाखाली लढवली गेली. गेल्या निवडणुकीत काँग्रेससोबत बंडखोरी करून भाजपला 12 नगरसेवकांचा पाठिंबा देणारे रामू तिवारी हे यावेळी भाजपसोबत होते. त्याचाही मोठा फायदा यावेळी भाजपला मिळाला. त्यामुळे काँग्रेसपासून सत्ता खेचून आणण्यात भाजपला यश आलं आहे.

भाजपनं इथं सत्ता स्थापन करण्यासाठी सर्व प्रयत्न केले. स्थानिक खासदार आणि केंद्रिय गृहराज्यमंत्री, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची इथं सभा झाल्या. सुधीर मुनगंटीवारांनी चंद्रपुरातील १७ पैकी १६ प्रभागात सभा घेऊन झंझावाती प्रचार केला. अडीच वर्षात झालेली विकासकामे हा भाजपच्या प्रचाराचा मुद्दा होता.

काँग्रेसनं ही निवडणूक माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात लढली. काँग्रेसतर्फे या निवडणुकीत माज़ी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माज़ी खासदार नरेश पुगलिया यांच्या सभा झाल्या. मालमत्ता करात झालेल्या वाढीच्या मुद्दयावरुन काँग्रेसने भाजपविरोधी प्रचार सुरू केला होता. भाजप आणि काँग्रेस दोघांनीही ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.

2012च्या महापालिका निवडणुकीत पक्षीय बलावल ?

एकूण जागा- 66
काँग्रेस- 26
भाजप- 18
शिवसेना- 5
राष्ट्रवादी- 4
मनसे- 1
बीएसपी-1
भारिप बहुजन महासंघ- 1
अपक्ष- 10