Published On : Mon, Dec 16th, 2019

‘चौकशीच्या नावाखाली शिवस्मारकाच्या कामाला स्थगिती द्यायचेय’

Advertisement

‘अरबी समुद्रात होणाऱ्या प्रस्तावित शिवस्मारकाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप माजी मंत्री व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज स्पष्ट शब्दांत फेटाळून लावला. ‘शिवस्मारकाच्या कामात कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार वा अनियमितता नाही. याबाबतचे सर्व आरोप बिनबुडाचे आहेत,’ असं पाटील यांंनी ठणकावून सांगितलं.

नागपूर: ‘अरबी समुद्रात होणाऱ्या प्रस्तावित शिवस्मारकाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप माजी मंत्री व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले. ‘शिवस्मारकाच्या कामात कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार वा अनियमितता नाही. याबाबतचे सर्व आरोप बिनबुडाचे आहेत,’ असं पाटील यांंनी ठणकावून सांगितलं.

राज्य विधीमंडळाच्या नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात सहभागी होण्यासाठी गेले असता पाटील यांनी याबाबत भाष्य केलं. शिवस्मारकाच्या कामात भाजप सरकारनं भ्रष्टाचार केल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्याची चौकशी केली जाईल, असं सत्ताधारी गोटातून सांगण्यात येत आहे. चंद्रकांत पाटील यांनी मात्र ही सगळी चर्चा निराधार असल्याचं स्पष्ट केलं.

‘शिवस्मारकाच्या कामाचे ३८०० कोटींचे टेंडर २५०० कोटींवर आलं आहे. अद्याप एका पैशाचंही पेमेंट केलं गेलेलं नाही. त्यामुळं यात भ्रष्टाचार किंवा अनियमितता काहीही नाही. या प्रकरणी आम्ही सर्व चौकशांना तयार आहोत. लवकर चौकशी करा. लांबवू नका, असं आव्हानच पाटील यांनी सरकारला दिलं. ‘प्रस्तावित शिवस्मारकामुळं सरकारमधील काहींच्या पोटात दुखत आहे,’ असा आरोपही त्यांनी केला.