मुंबई : राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत सर्व ६ उमेदवार बिनविरोध झाल्याची अधिकृत घोषणा आज झाली. भाजपाकडून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजित गोपछडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे आणि शिवसेनेचे मिलिंद देवरा या निवडणुकीत बिनविरोध निवडून आले. १६ फेब्रुवारीला अर्जांच्या छाननीत एक अर्ज बाद ठरल्यानं ६ जागांसाठी ६ उमेदवार रिंगणात होते.
अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आज एकाही उमेदवाराने अर्ज मागे न घेतल्याने सर्व निवडून आल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आज केली. राजस्थानमध्ये, राज्यसभेच्या तीन रिक्त जागांवर काँग्रेसच्या उमेदवार सोनिया गांधी, तसंच भाजपाचे उमेदवार चुन्नीलाल गरसिया आणि मदन राठोड बिनविरोध निवडून आले आहेत.
राज्यसभेवर बिनविरोध निवडून आल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मिलिंद देवरा यांनी आभार मानले. राज्यसभेवर बिनविरोध निवडून आल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेनेच्या नेत्यांचे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्व समर्पित कार्यकर्त्यांचे आभार. मी संसदेत मुंबई, महाराष्ट्र आणि भारताच्या विकासासाठी काम करण्यास उत्सुक आहे, असे देवरा म्हणाले.
पेपर लीक पर फडणवीस के इस्तीफे की मांग तेज
विकास निधि कार्यों में टेंडर घोटाले, जांच की मांग
पाचपावली में अवैध कत्लखाने का पर्दाफाश #NagpurNews #Panchpaoli #PoliceAction #CrimeNews #newsupdate
पेपर लीक पर सख्त कानून, ठाकरे बंधुओं पर तंज #Bawankule #NagpurNews #PoliticalNews...
नागपुर के एमआईडीसी थाना क्षेत्र में मोबाइल दुकान में चोरी #nagpurnews #crimenews...
हुड़केश्वर पुलिस की कस्टडी से कुख्यात चोर फरार #nagpurnews #crimenews #accused #newsupdate





