Published On : Thu, Jan 30th, 2025
By Nagpur Today Nagpur News

चंडीगड महानगरपालिकेत भाजपाचा महापौर,आप-काँग्रेसकडे बहुमत तरीही बदलले सत्तेचे समीकरण!

चंडीगड: चंडीगड महानगरपालिकेत पुन्हा एकदा भाजपचा झेंडा फडकला आहे. प्रतिष्ठेच्या ठरलेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत आम आदमी पक्ष आणि काँग्रेसला भाजपाने धूळ चारली. निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार हरप्रीत कौर यांनी विजय मिळवला आहे.

त्यांना १९ मतं मिळाली. तर आम आदमी पक्षाच्या उमेदवार प्रेमलता यांना १७ मतांसह पराभवाचा सामना करावा लागला. या निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी केल्यानंतरही आप आणि काँग्रेसची तीन मतं फुटल्याने सत्तेचे समीकरण बदलल्याचे पाहायला मिळाले.

Gold Rate
Friday 07 Feb. 2025
Gold 24 KT 84,900 /-
Gold 22 KT 79,000 /-
Silver / Kg 96,200 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

चंडीगड महानगरपालिकेमध्ये एकूण नगरसेवकांची संख्या ही ३५ आहे. तसेच चंडीगडचे खासदारही महापौर निवडणुकीत मतदान करत असल्याने एकूण मतदारांची संख्या ३६ होते. त्यात विजयी होण्यासाठी १९ मतं आवश्यक असतात.

दरम्यान, महानगर पालिकेत भाजपा १६ नगरसेवकांसह सर्वात मोठा पक्ष आहे. तर आम आदमी पक्षाचे १३ आणि काँग्रेसचे ६ नगरसेवक आहेत. त्याशिवाय येथील खासदार मनिष तिवारी हे काँग्रेसचे असल्याने या निवडणुकीत काँग्रेस आणि आपकडे एकूण २० मतं होती. तरीही तीन मतदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचा फटका त्यांना या निवडणुकीत बसला आहे.

Advertisement