Published On : Tue, Jan 23rd, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपूरसह विदर्भात पुढील तीन दिवस अवकाळी पावसाची शक्यता !

Advertisement

नागपूर : महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील तीन दिवस अवकाळी पाऊस राज्यात हजेरी लावणार असल्याचे हवामान खात्याने वर्तविले आहे. कोकण आणि आजूबाजूच्या परिसरात चक्राकार वारे वाहत आहेत.हे वारे समुद्राच्या १.५ किमी वर वाहत असल्याने कर्नाटक आणि विदर्भ, मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता वर्तविली जात आहे.

नागपूरसह पूर्व व पश्चिम विदर्भात तुरळक ठिकाणी आज अवकाळी पावसाची शक्यता आहे. दरम्यान, राज्यात किमान तापमान पुढील काही दिवस १ ते २ अंशांनी घसरणार असून विदर्भात पुढील ५ दिवस किमान तापमानात कोणताही बदल होणार नसल्याचे प्रादेशिक हवामान खात्याने म्हटले.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पुढील 48 तासात विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुढील काही दिवसात पावसाच्या सरी पाहायला मिळण्याच अंदाज आहे. अवकाळी पावसाच्या शक्यतेमुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.