Published On : Mon, Oct 11th, 2021

स्थानिय ट्रांसपोर्ट ना टोल फ्री करण्याकरिता टोल नाक्यावर केले चक्का जाम आंदोलन

बुधवारी बैठकीत स्थानिय ट्रांसपोर्ट ला टोल फ्री न केल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा.

कन्हान : – तारसा रोड चौक कन्हान ते गहुहिवरा- चाचेर मार्गावरून जड वाहतुक बंद करण्याच्या नागरि कांच्या मागणी वरून (दि.३०) सप्टेंबर पासुन या मार्गा वरील जड वाहतुक बंद करण्यात आल्याने कन्हान, कांद्री व कोळसा खदान, टेकाडी च्या स्थानिय (लोकल ) ट्रान्संपोर्ट यांनी निवेदन देऊन टोल फ्री करण्याची मा गणी केली होती. परंतु मागणी पुर्ण न झाल्याने बोरडा रोड कांद्री टोल नाक्याजवळ शैकडो स्थानिक ट्रान्संपो र्ट मालकांनी चक्का जाम आंदोलन केल्याने वाहनाचे चाके थांबुन लांबच लांब रांगा लागुन एक तास महामा र्गावर चक्का जाम झाल्याने पोलीस अधिकारी व ओरिं यटल टोल नाक्याचे अधिका-यांनी आंदोलन कर्त्यांशी चर्चा करून बुधवारी ला टोल नाका वरिष्ठ अधिकारी यांच्याशी चर्चा बैठक ठरल्याने आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले असुन बुधवार च्या बैठकीत स्थानिय ट्रांस पोर्ट ना टोल फ्री न केल्यास उग्र आंदोलन करण्याचा ईशारा देण्यात आला आहे.

Advertisement

तारसा रोड चौक कन्हान ते गहुहिवरा- चाचेर मार्गावरून कन्हान शहरातील नागरिक सकाळी व सायंकाळी पायदळ फिरायला ला जात असुन दिवस भर या मार्ग रस्त्यानी नागरिकांची व वाहनाची चांगली च वर्दळ असते. अश्यातच तारसा रोड चौक कन्हान ते गहुहिवरा-चाचेर मार्ग रस्त्यानी मागील काही दिवसा पासुन कोळसा, रेतीचे ओव्हर लोड १४ चक्का, २० चक्का मोठ मोठे जड वाहतुक सुरु झाल्याने १० ते १२ फुटाच्या मार्ग रस्त्यावर मोठ मोठे गड्डे होऊन रस्ता खराब झाल्याने नागरिकांना ये-जा करिता भयंकर त्रास सहन करावा लागत असुन मोठ्या अपघाताची भिती निर्माण झाली होती. त्यामुळे स्थानिक नागरिकां ची गहुहिवरा-चाचेर मार्गावरून जड वाहतुक बंद कर ण्याच्या मागणीने (दि.३०) सप्टेंबर पासुन गहुहिवरा-चाचेर मार्गावरून जड वाहतुक बंद करण्यात आल्याने कन्हान, कांद्री, कोळसा खदान च्या स्थानिय ट्रान्संपोर्ट ना विविध समस्या निर्माण झाल्याने ट्रान्संपोर्ट मालकां नी निवेदन देऊन टोल फ्री करण्याची मागणी केली होती.

परंतु मागणी पुर्ण न झाल्याने स्थानिय लोकल ट्रान्संपोर्ट मालकांनी रविवार (दि.१०) ऑक्टोबंर ला सकाळी ११ वाजता बोरडा रोड कांद्री टोल नाक्या जवळ नागपुर जिल्हा काॅंग्रेस कमेटी जिल्हा उपाध्यक्ष नरेश बर्वे व ग्राम पंचायत कांद्री उपसरपंच श्यामकुमार बर्वे यांच्या नेतृत्वात शैकडो स्थानिक ट्रान्संपोर्ट माल- कांनी चक्का जाम आंदोलन सुरु केल्याने वाहनाचे एक तास चाके थांबुन चारपदरी बॉयपास महामार्गावर जाम लागुन वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी मुख्तार बागवान, पो लीस निरीक्षक विलास काळे, ओरिंयंटल टोल नाक्याचे अधिका-यांनी आंदोलन कर्त्यांशी चर्चा करून बुधवार (दि.१३) ऑक्टोबंर ला टोल नाक्याचे वरिष्ठ अधिका-यांशी चर्चा बैठक ठरविल्याने स्थानिय ट्रांसपोर्ट माल- कांनी आपसात चर्चा करून सहमती दर्शवुन आंदोलन मागे घेतले. आणि बुधवार च्या बैठकीत स्थानिय ट्रांस पोर्ट ना टोल फ्री न केल्यास उग्र आंदोलन करण्याचा ईशारा देण्यात आला आहे.

सदर आंदोलनात तनाव पुर्ण परिस्थिती निर्माण होऊन अनुचित प्रकार घडु नये म्हणुन पोलीस विभागा ने दंगा नियंत्रण पथक, अतिरिक्त पुलिस बल, अग्निश मन विभाग, प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान चे पथका सह मोठ्या प्रमाणात पोलीसांचा तगडा बंदोबस्त लावु न परिस्थिती वर नियंत्रणा ठेवण्यात आली.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement