Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Tue, Aug 25th, 2020

  मध्य रेल्वे नागपूर विभाग तंत्रज्ञानात अव्वल

  – एका क्लिकवर रेल्वे यार्ड थेट नियंत्रण कक्षात,वेळ पालनात देशात पाचव्या क्रमांकावर

  नागपूर– भारतीय रेल्वे तंत्रज्ञान क्षेत्रात प्रगती करीत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रेल्वेचा विमानाशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कधी काळी हाताने करण्यात येणारी सर्व कामे कर्मचारी आता तंत्रज्ञानाच्या साह्याने करतात. त्यामुळे वेळेची बचत तर झालीच शिवाय अचूकताही साधली गेली. मध्य रेल्वे नागपूर विभाग तंत्रज्ञान क्षेत्रात अव्वल असून कधी काळी यार्डची स्थिती पाहण्यासाठी नकाशाची मदत घ्यावी लागायची. आता सॉफ्टवेअरच्या मदतीने थेट नियंत्रण कक्षातच यार्डातील परिस्थितीचा आढावा घेणे शक्य झाले आहे. मध्य रेल्वे नागपूर विभागाने तंत्रज्ञान क्षेत्रात केलेल्या आधुनिक क्रांतीमुळे हे शक्य झाले आहे.

  नियंत्रण कक्षातून धडधड करीत येणाèया रेल्वेच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवल्या जाते. त्याचप्रमाणे रेल्वे स्थानकावरील यार्डाचीही पाहणी केली जाते. यापूर्वी यार्डाची पाहणी नकाशाद्वारे व्हायची. आता नागपूर विभागाने सॉफ्टवेअर तयार केले असून एका क्लिकवर संपूर्ण यार्ड थेट नियंत्रण कक्षात दिसते. यामुळे वेळेची बचत झाली असून, मानवी हस्तक्षेपही कमी झाला आहे.

  दुसèया मंडळातून नागपूर विभागात येणाèया गाड्यांची qलक अर्थात जोडणी qकवा प्रवेशासाठी लिखापढी करावी लागायची. वेळखाऊ पद्धत असल्याने नागपूर विभागाने त्यासाठी एक सॉफ्टवेअर तयार केले. नागपूर विभागात प्रवेश केलेल्या गाडीची qलक मानव नव्हे तर यंत्राद्वारे जोडली जाते. यासाठी एक कक्ष तयार करण्यात आला असून, नागपूर विभागात येणाèया प्रत्येक गाडीची qलक याच पद्धतीने जोडली जाते.

  कोट्यवधींच्या रेल्वे प्रकल्पासाठी मोठमोठ्या शिटवर आधी आराखडे तयार केले जायचे. अनेक दिवस ते आरखडे जपून ठेवावे लागत. अधिकाèयांना माहिती द्यायची असल्यास टेबलवर येणार नाही, अशी भली मोठी ड्रॉइंग शिट सोबत बाळगावी लागत असे. वारंवार उघडणे आणि पुन्हा व्यवस्थित ठेवणे यात आराखड्याच्या qचधड्या व्हायच्या. आता सॉफ्टवेअरच्या माध्यमातून भली मोठी ड्रॉइंग शिट एका संगणकार शेकडो वेळा पाहता येते. ती सुरक्षित असते.

  कुठेही घेवून जाण्यास काहीच अडथळा नाही. या तंत्रज्ञानामुळे रेल्वेतील अभियंत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. याशिवाय प्रत्येक विभागातील कर्मचाèयांची कामगिरी पाहण्यासाठी परफॉर्मन्स इंडिकेटर ही यंत्रणा तयार करण्यात आली आहे. अत्याधुनिक यंत्रणेच्या माध्यमातून प्रत्येक विभागाची कामगिरी पाहिली जाते. रेल्वे बोर्ड स्तरावरील केपीआय नावाने एक पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या पोर्टलचे भारतीय रेल्वेतील ६८ मंडळात ११ वे स्थान असून, मध्य रेल्वेच्या पाच मंडळात नागपूर विभाग प्रथम क्रमांकावर आहे.

  गाड्या पास करण्यात ६ व्या क्रमांकावर
  विभागात आलेली रेल्वे गाडी थांबवून न ठेवता ती तत्परतेने पुढल्या प्रवासासाठी रवाना करण्यात मध्य रेल्वे सहाव्या क्रमांकावर आहे. देशभरातील कुठल्याही मंडळातून आलेली गाडी क्षणाचाही विलंब न लावता तांत्रिक बाबी तपासल्यानंतर पुढे रवाना केली जाते. हे आव्हानात्मक कार्य असले तरी मध्य रेल्वे चांगल्या पद्धतीने पार पाडीत आहे. त्यामुळे वेळेची बचत होते आणि संचालनही सुरळीत होते.

  मध्य रेल्वे वेळ पालनात प्रथम
  रेल्वेत वेळेला खुप महत्त्व आहे. एका क्षणात अपघातात अनेकांचा जीव जावू शकतो तर एका क्षणाने हजारोंना जीवनदान मिळू शकते. वेळेचे पालन करण्यात मध्य रेल्वे भारतीय रेल्वेत पाचव्या क्रमांकावर तर मध्य रेल्वेत नागपूर मंडळ प्रथम क्रमांकावर आहे.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145