नागपूर : कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान परिसरात मध्य भारतातील सर्वांत भव्य आणि उंच श्री हनुमान मूर्ती साकारण्याचे काम वेगाने सुरू असून, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्यक्ष पाहणी करत कामाचा आढावा घेतला. यासंदर्भातील माहिती त्यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे दिली.
भव्य स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना ठरणाऱ्या या दिव्य मूर्तीची फाउंडेशनसह एकूण उंची २०६ फूट असणार आहे. त्यापैकी श्री हनुमान मूर्तीची उंची १६२ फूट असून, प्रभूंच्या पराक्रमाचे प्रतीक असलेली गदा तब्बल ७५ फूट उंच साकारली जात आहे. या मूर्तीमुळे कोराडी परिसराला धार्मिक आणि पर्यटनदृष्ट्या नवी ओळख मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
श्रद्धा, अध्यात्म आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम असलेला हा प्रकल्प भविष्यात नागपूरच्या वैभवात मानाचा तुरा ठरणार आहे. भाविकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणाऱ्या या ठिकाणी भविष्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटक आणि भक्तांची गर्दी होण्याची शक्यता आहे.
या पाहणीवेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, अधीक्षक अभियंता प्रशांत भांडारकर, प्रकल्प सल्लागार अविनाश नवरकर तसेच संबंधित अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
नागपुर में आधी रात घर में घुसकर युवती से लूट #nagpurnews #crime...
मात्र 10 मिनट में 10 लाख के मोबाइल फोन चोरी कर हुआ...
NAGPUR TODAY | TOP - 10 NEWS | 27 JUNE 2026 #newsupdate...
नागपुर में देह व्यापार का भंडाफोड़ #nagpurnews #Crime #prostitute #NewsUpdate #latestnews
नागपुर के प्रतापनगर में खड़ी दो गाड़ियों में लगाई आग #nagpurnews #NewsUpdate...









