Published On : Tue, Apr 17th, 2018

चारपदरी सिमेंट रस्ता नालीचे एका महिन्यातच वाजले बारा


कन्हान: वरील ऑटोमोटिव्ह चौक ते टेकाडी फाट्यापर्यंत सिमेंट मार्गाचे १८ किलो मीटर लांबीचे निर्माणकार्य सुरू आहे. जवळपास २५३ कोटींचा खर्च अपेक्षित असलेल्या या मार्गाला निर्माणधिनच्या काळातच जागोजागी तडे गेले असुन नाली एका महिन्यातच तुटल्यामुळे नालीचे बारा वाजल्याने या संपुर्ण कामावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अपुऱ्या सुरक्षाव्यवस्थेने आतापर्यंत दोन निष्पाप लोकांचे जीव गेला असुन कित्येक लोक गंभीर जखमी झाले आहेत.


केसीसी बिल्डकॉन कंपनी व्दारे टेकाडी फाटा ते ऑटोमोटिव्ह चौक नागपुर चारपदरी सिमेंट रस्ता बनविण्याचे काम जोमाने सुरू आहे. या कामादरम्यान नवनिर्माण रस्त्यावर पाणी टाकण्यात येत नाही. त्यामुळे सिमेंट रोडचे मजबुतीकरण होत नसल्याने या रोडला निर्माणधिनच्या काळातच मोठमोठे तडे गेले असून अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. हाच प्रकार रस्त्याच्या कडेला बांधण्यात येत असलेल्या नाल्यांच्या बाबतीत असून या नाल्या बांधकाम करित असताना दुसऱ्याच दिवशी सेंट्रींग काढुन घेण्यात येते व एकही दिवस पाणी मारत नसल्याने बांधकामात मजबुती येत नसल्याने कांद्री पेट्रोल पंप समोर नालीवरचे स्लाप तुटुन दोन ठिकाणी दहा ते बारा फिट नालीचे भगदाड पडले आहे.


या नाली बांधकामाने एका महिन्यातच दम तोडला असल्याने ५० वर्ष तर सोडाच या निर्माण कार्यात जरास्या निष्काळजी मुळे येणाऱ्या एकाच वर्षात हा महामार्ग पुन्हा दुरुस्ती करावे लागेल का असे चिन्हे दिसु लागल्याने प्रश्न व वाचा नागरिक करीत असुन या सिमेंट रस्त्याचे मुल्याकंन व्यवस्थित करण्यात यावे अशी मागणी प्रवासी, सर्वसामान्य नागरिक करीत आहे.