Published On : Fri, Sep 20th, 2019

सीमेंट रोड बांधकामामुळे शहरातील विविध मार्गांवर वाहतूक बंद

Advertisement

मनपा आयुक्तांचे आदेश

नागपूर : शहरातील विविध भागात सुरू असलेल्या विकास कामांतर्गत सीमेंट काँक्रीट रस्ते बांधकामादरम्यान शहरातील विविध मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. यासंदर्भात महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नुकतेच आदेश निर्गमीत केले.

Gold Rate
Aug 4 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 43,400 /-
Gold 22 KT ₹ 1,33,100 /-
Silver/Kg ₹ 2,21,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सीमेंट काँक्रीट रस्ते प्रकल्प टप्पा-३ मध्ये पॅकेज क्रमांक ८ मधील रस्ता क्रमांक ३१, एक स्तंभ चौक ते नार्थ अंबाझरी रोड (अजीत बेकरी)दरम्यान सीमेंट रस्त्याचे बांधकाम सुरू असून यामार्गावरील उजव्या बाजूची वाहतूक १४ डिसेंबर २०१९पर्यंत बंद राहील. याशिवाय पॅकेज क्र. ६ मधील क्रीडा चौक ते तुकडोजी पुतळा (रस्ता क्र.२१) मार्गावरील उजवीकडील वाहतूक १८ नोव्हेंबर २०१९ पर्यंत प्रतिबंधित राहील. पॅकेज क्र.२ मधील रस्ता क्रमांक ३, आझाद चौक ते आयचित मंदिर व झेंडा चौक ते सक्करदरा चौक व्हाया जुनी शुक्रवारी दरम्यानची वाहतूक प्रतिबंधित करण्यात आली आहे. रस्ता क्रमांक ३चा भाग गजानन चौक ते सक्करदरा चौक दरम्यानची डाव्‍या बाजुची वाहतूक ३१ डिसेंबर २०१९पर्यंत बंद करण्यात येईल.

पॅकेज क्र.१ मधील रस्ता क्रमांक १५, नारा घाट कुशीनगर ते साई मंदिर रिंग रोड चौक दरम्यानची वाहतूक १० ऑक्टोबर २०१९ पर्यंत प्रतिबंधित राहील. पॅकेज क्र.१ मधील रस्ता क्रमांक १३ टेका नाका चौक ते नारी गाव पैकी Ch. १० ते ९२० पर्यंत मार्गावरील वाहतूक १० ऑक्टोबर २०१९ या कालावधीपर्यंत बंद राहील. पॅकेज क्र.१ मधील रस्ता क्रमांक १८ बापुना वाईन शॉप ते गुरूनानक सोसायटी जी कुमार आरोग्यधाम पर्यंतची दोन्ही बाजूची वाहतूक १० ऑक्टोबर २०१९ पर्यंत प्रतिबंधित करण्यात आली आहे.

Advertisement

पॅकेज क्र.१ मधील रस्ता क्रमांक १९ कुकरेजा नगर ते कस्तुरबा नगर गल्ली नं. १,२,३,४ कस्तुरबा नगर झोपडपट्टी दरम्यानच्या मार्गावरील वाहतूक १० ऑक्टोबर २०१९ पर्यंत दोन्ही बाजुच्या वाहतुकीसाठी बंद राहील. सदर मार्गांवरील वाहतूक अंतर्गत रस्त्यांवरून वळविण्यात येईल. यासंबंधीचे आदेश महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. सदरबाबतचे लेखी आदेश नुकतेच निर्गमित करण्यात आले आहेत.

Advertisement
स्कॉर्पियो में किडनैप... 7 किलोमीटर दूर ले जाकर थर्ड डिग्री... #nagpurnews #crime #policeaction

स्कॉर्पियो में किडनैप... 7 किलोमीटर दूर ले जाकर थर्ड डिग्री... #nagpurnews #crime...

छात्र मुद्दे पर Youth Congress का प्रदर्शन | 'Amit Shah Jawab Do' बैनर #nagpurnews #politics

छात्र मुद्दे पर Youth Congress का प्रदर्शन | 'Amit Shah Jawab Do'...

हर घर तिरंगा अभियान का भव्य आगाज; शहर में वितरित होंगे 1.75 लाख तिरंगे

हर घर तिरंगा अभियान का भव्य आगाज; शहर में वितरित होंगे 1.75...

40 लाख की प्लॉट ठगी का नया केस दर्ज, सक्करदरा पुलिस करेगी पूछताछ

40 लाख की प्लॉट ठगी का नया केस दर्ज, सक्करदरा पुलिस करेगी...

2009 सीडी मामले में उद्धव ठाकरे का बयान #MaharashtraNews  #UddhavThackeray #ShivSena #Political

2009 सीडी मामले में उद्धव ठाकरे का बयान #MaharashtraNews #UddhavThackeray #ShivSena #Political

बिना दस्तावेज मध्य प्रदेश की बस जब्त #MaharashtraNews #STBus #RTO #BusChecking #MPBus #TrafficNews

बिना दस्तावेज मध्य प्रदेश की बस जब्त #MaharashtraNews #STBus #RTO #BusChecking #MPBus...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges