Published On : Fri, Jun 21st, 2019

दीनदयालनगर आजी-आजोबा उद्यानात योग दिन साजरा

Advertisement

जागतिक योग दिनाच्या निमित्ताने दीनदयालनगर येथील आजी-आजोबा उद्यानात ज्योती शेंबेकर व अरुणा इखार यांच्या मार्गदर्शनात ज्येष्ठ महिलांनी सर्वप्रकारची योगासने करुन योग दिवस साजरा केला. यामध्ये ५० ते ८० वर्षे पूर्ण झालेल्या सर्व ज्येष्ठ महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

या उद्यानात सर्व महिला सकाळी ६ ते ८ यावेळात दररोज पायी चालने, ग्रीन जीम, शरीर संचलन, योगासने तर करतातच शिवाय प्रार्थना देशभक्ती गीते ही म्हणतात तसेच सर्वांना आनंद देणारी खेळही खेळतात त्यामूळे मनावरील ताण कमी होण्यास मदत होते.

शरीर स्वस्थ ठेवणे आनंद देणे व घेणे यामुळे सर्वांचे आरोग्य ही उत्तम आहे. उद्यानात स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, वाढदिवस साजरे करणे, गरजुंना मदत करणे हेही उपक्रम राबविले जातात.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.