Published On : Mon, Sep 19th, 2022
By Nagpur Today Nagpur News

रमाई वाचनालयात पीरियर रामास्वामी व प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती साजरी

Advertisement

कन्हान : – गणेश नगर स्थित रमाई सार्वजनिक वाच नालयात आधुनिक भारताचे नवनिर्माता व सामाजा तील परागत रूढी, अंधश्रध्दा, जातीभेद, बालविवाह यांचे कडवे टीकाकार, धर्म चिकित्सक करून सामा जिक परिवर्तन हे देशाची मुलभुत गरज लक्षात घेत वैचारिक प्रबोधन करणारे क्रांतिकारी परिवर्तनवादी दोन महान समाज सुधारक पेरियर रामास्वामी व प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांची संयुक्त जयंती कन्हान येथे जयंती साजरी करण्यात आली.

शनिवार (दि.१७) सप्टेंबर ला रमाई सार्वजनिक वाचनालय गणेश नगर कन्हान येथे समाज सुधारक पेरियर रामास्वामी व प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे या दोन्ही परिवर्तनवादी विचारवंताच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार माल्यापर्ण व अभिवादन करून जयंती कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.

याप्रसंगी दोन्ही महान वैचारिक योध्दा च्या जीवन चरि त्रावर प्रकाश टाकीत सतिश भसारकर यांनी आपले विचार व्यकत केले कि, या महान व्यक्ती ने सामाजिक वाईट प्रथा, रूढी परंपरा, अंधश्रध्दा च्या विरोधात क्रांती चा बिगुल फुकुन आपल्या तर्कबुद्धीने विज्ञान वादी विचार आणि विवेक दृष्टी समाज प्रबोधन करित जनजागृत करण्याचे काम केले. अंधविश्वास, पाखंड शाही च्या विरोधात आवाज बुलंद करित समांनता, न्याय, स्वातंत्र्य करिता ओबीसी, बहुजन, वंचित, दलि तांच्या उत्थाना करिता आपले जिवन वाहुन घेतले.

तसेच आभार प्रदर्शनात माला मडंपे ने प्रबोधनकार केशव ठाकरे यांचा ” देवळाच्या धर्म आणि धर्माचे देवळे ” या पुस्तकाचे वाचन केल्यास सर्व बहुजनाचे डोळे उघडतील. असा आशावाद करित या पुस्तकाचे जास्तीत जास्त लोकांनी वाचन करावे असे आव्हान केले. यावेळी प्रामुख्याने गाथा राऊत, मधुकर गणवीर, माला मंडपे, शैलेश दिवे, धर्मेंद्र गणवीर, सागर उके, दिनेश नारनवरे सह वाचनालयाचे सर्व वाचक, अभ्या सक हयानी उपस्थित राहुन जयंती साजरी केली.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.