नागपूर : आज जागतिक सायकल दिवस साजर होत असून, महा मेट्रोने देखील यामध्ये सहभाग घेतला. महा मेट्रोने नेहमीच नॉन मोटराइजड साधनाना प्रोत्साहन दिले एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत जाण्याकरिता मेट्रो ट्रेन मध्ये सायकल नेता येते आणि नागरिकांची याला पसंती मिळत आहे.
आज जागतिक सायकल दिनाच्या दिवशी महा मेट्रोचे कार्यकारी संचालक (ओ ऍंड एम) श्री. उदय बोरवणकर यांनी सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्या सोबत एयरपोर्ट मेट्रो साऊथ मेट्रो स्टेशन ते एयरफोर्स स्टेशन पर्यंत सायकल ने प्रवास करत सांकेतिक पद्धतीने जागतिक सायकल दिवस साजरा केला. या सायकल दिनानिमित्य सायकल चालवण्याचे महत्व तसेच आरोग्य तंदुरुस्त ठेवण्याकरिता महत्त्वपूर्ण भूमिकाचा संदेश या दरम्यान दिला तसेच त्यांनी सांगितले कि सायकल आणि मेट्रोचा उपयोग दैनंदिन दिवसाचा भाग बनवा ज्याने आरोग्य व पर्यावरण राखण्यास महत्वपूर्ण मदत मिळेल.
नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या ऑरेंज आणि ऍक्वा लाईन येथे दर १५ मिनिटांनी प्रवासी सेवा सुरु असून नागरिक याचा वापर करीत आहे. मेट्रो प्रवासा सोबतच फिडर सर्विस देखील उपलब्ध आहे. त्यामुळे आता मेट्रो सोबत सायकल अशी पर्यावरणपूरक प्रवासी सेवा नागरिकांच्या फायद्याची आहे. मेट्रोसह्या डब्ब्यांमध्ये सायकल स्वारांकरिता योग्य सूचना फलक तसेच सायकल ठेवण्याकरिता उपयुक्त जागा नेमली आहे.
महा मेट्रोने मल्टी मॉडेल इंटिग्रेशन अंतर्गत अनेक उपाय योजना केल्या असून ज्यामध्ये मेट्रो स्थानकांवर ई- बाईक, ई – रिक्षा, इलेक्ट्रिक वाहनांन करिता चार्जिंग पॉईंट,फिडर बसची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच ऑरेंज आणि ऍक्वा लाईन मार्गिकेवरील प्रत्येक मेट्रो स्थानकांवर प्रवाश्यानकरिता सायकल ठेवण्यात आल्या असून या सायकल ला नागरिकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. दररोज कुठल्या न – कुठल्या मेट्रो स्टेशनवरून मेट्रो प्रवासी सायकल सोबत घेऊन मेट्रो प्रवास करतांनाचे दिसून येते.मेट्रो स्थानकांवर ठेवण्यात आलेल्या सायकल या माय-बाईक व व्हीआयपीएल कंपनीच्या आहेत. या सर्व सायकल ऍप बेस्ड असून नागरिक सहज पणे सायकल मेट्रो स्थानकावरून घेऊ शकतात.