Published On : Tue, Jan 8th, 2019

सत्यशोधक संघ कन्हान व्दारे जागतिक पंचशील ध्वज दिन साजरा

कन्हान : – १९६४ मध्ये बनविण्यात आलेल्या स्टेशन रोड कन्हान येथील बौद्ध विहारात सत्यशोधक संघ कन्हान व्दारे पंचशील ध्वजाला सलामी देऊन जागतिक पंचशील ध्वज दिन साजरा करण्यात आला .

मंगळवार (दि.८) जानेवारी ला १३८ बौद्ध शांती चे प्रतीक असलेल्या जागतिक पंचशील ध्वज दिना निमित्य सत्यशोधक संघ कन्हान व्दारे रामटेक क्षेत्रातील नागपुर ग्रामीण मधिल रेल्वे स्टेशन रोड, इंदिरागांधी कनिष्ठ महाविद्यालय च्या बाजूला असलेला सन १९६४ मध्ये सर्व प्रथम निर्माण केलेल्या कन्हान नगरीच्या बौद्ध विहारात पंचशील ध्वजाला सलामी देऊन पंचशील ध्वजाचे प्रत्येक रंगाचे महत्त्व खालील प्रमाणे विशद करण्यात आले .

रंगानुसार त्या रंगाचे महत्व निळा – हा आशावादी, प्रेम, शांती , पिवळा -मध्यम मार्ग, प्रगती, उत्साह, पांढरा – समर्पण, निर्मलता, शुद्धता, केसरी – त्याग, दया, करुणा, शिक्षा, ज्ञान, धैर्याचे प्रतीक संबोधन करतात.

जगातील बौध्दांचे एकच प्रतीक असावे, या विचाराने श्रीलंकामध्ये १८८० अनागारिक देवमित्र धम्मपाल, महास्थविर गुणानंद, सुमंगल, बौध्द विव्दान जी. आर. डिसिल्वा आदीने मिळून निळा, पिवळा, लाल, पांढरा व केसरी अशा पाच रंगाच्या उभ्या व आडव्या पट्ट्यामध्ये ‘विश्व बौध्द ध्वजा’ ची निर्मिती केली आहे. कालांतराने त्याला विश्व मान्यता प्राप्त झाली.

जागतिक पंचशील ध्वज दिन कार्यक्रमास मिलिंद वागधरे, अखिलेश मेश्राम, शक्ति पात्रे, रजनीश मेश्राम, सतीश भसारकार, दीपचंद शेंडे, स्वप्निल वाघधरे, नितिन मेश्राम, चन्दन मेश्राम, ऋषभ बावनकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते .