Published On : Wed, Jan 29th, 2020

संत बाबा ताजुद्दीन यांचा जन्मदिवस साजरा

कन्हान : – संत बाबा ताजुद्दीन यांच्या १५९ व्या जन्मदिना निमित्त कन्हान तारसा रोड चौक येथे महाप्रसाद व कव्वाली चे आयोजन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येत भाविकानी उपस्थित राहुन कार्यक्रमाचा लाभ घेतला.

संत बाबा ताजुद्दीन यांच्या जन्मोत्सवा निमित्त ताज साई भक्तजन मंडळ तर्फे आयोजित १० व्या ‘ एक शाम ताज साई के नाम ‘ कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक धीरज पांडे यांनी बाबा ताजुद्दीन व साई बाबा यांचे स्तुतिगान प्रस्तुत केले.

कार्य क्रमाला प्रामुख्याने हजरत अम्मा साहेबा गाड़ेघाट सज्जादानशीन ताजी तनवीरु द्दीन व ताजी मुस्तफीजुद्दीन उपस्थित होते. प्रारंभी बाबा ताजुद्दीन यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करून फातिया नंतर केक कापण्यात आला, तदन्तर महाप्रसा दाच्या तसेच कव्वाली कार्यक्रमाचे भावि कांनी आस्वाद घेतला. कार्यक्रमाचे आयो जन साई-ताज भक्तजन मंडळ यांनी केले असुन बाबा ताजुद्दीन यांच्या जन्मो त्सव कार्यक्रमात संत साईबाबा यांची झांकी विशेष आकर्षणाचे केंद्र ठरली.

कार्यक्रमात नगरातील सामाजिक कार्य कर्ते व प्रतिष्ठित नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.