Published On : Wed, Mar 31st, 2021

इको फ्रेंडली वातावरणात होळी पर्व उत्साहाने साजरा

Advertisement

होळी चा रंग उधळला मात्र जरा जपूनच

कामठी:-दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा होळी या पर्वानिमित्त 28 मार्च ला तालुक्यात विविध संघटनेच्या वतीने वाईटाचा नायनाट करणे या भूमिकेतून सार्वजनिक तसेच खाजगी होळी जाळून होलिकादहन कार्यक्रम साजरा करण्यात आला तर होलिका दहन झाल्यानन्तर वाईटाचा नायनाट केल्याच्या आनंदात 29 मार्च ला धुलीवंदनाचा दिवस हा आनंदाचा मौजमस्तीचा असून बुरा ना मानो होली है या म्हणीनुसार एकमेकांना रंग लावीत गुलालाची उधळण करीत धुळीवनदानाचा दिवस हा इकोफ्रेंडली व खेळीमेळीच्या वातावरणात मोठ्या उत्साहाने पार पडला.तर मागच्या वर्षिसारखे यावर्षीसुद्धा कोरोनाचा विळखा असल्याने पाण्याची होळी न खेळता गुलाल लावून च होळी साजरी करण्यात आली यानुसार नागरिकांनी होळी चा रंग उधळला मात्र तो जरा जपूनच….

होळीचा सन म्हटला की तो आनंदाचा सन असतो सर्वच जण या सणाच्या प्रतीक्षेत असतात तर काही ठिकाणी धुळवडीच्या दिवशी मारामाऱ्या, भांडणे होत असल्याने या सनाला गालबोट लागीत असतात तर होळीच्या दुसरा दिवस धुळीवदन चा दिवस हा पोलिसांच्या खऱ्या परीक्षेचा दिवस असतो त्यामुळे स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन तसेच जुनी कामठी पोलीस स्टेशन च्या वतीने स्थानिक पोलीस अधिकारी कर्मचारी सह अतिरिक्त अधिकारी कर्मचारी तसेच राज्य राखीव पोलिस बल पथक बोलावून ठिकठिकानी पोलीस बंदोबस्त लावून विशेष लक्ष केंद्रित करीत खबरदारी घेतली तर वाहतूक पोलीस विभागाच्या वतीने खबरदारी घेत विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले होते परिणामी हा पर्व मोठ्या उत्साहाने पार पडले

या रंगोत्सवाच्या यशस्वीतेसाठी डीसीपी निलोत्पल व एसीपी रोशंन पंडित यांच्या मार्गदर्शनार्थ नवीन कामठी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मेंढे ,जुनी कामठी पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरिक्षक विजय मालचे यांच्या नेतृत्वात संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोलाची कर्तव्यदक्ष भूमिका साकारली.

Advertisement

संदीप कांबळे

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.